Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांनी कृषिविषयक ज्ञानही आत्मसात करावे : अशोक नांदुलकर

महागावच्या महात्मा फुले विद्यालयात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण





गडहिंग्लज (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांनी भविष्यात शेती आणि शेती व्यवसायाकडे सकारात्मक बघावे.त्यासाठी ' फाली 'संस्थेच्या माध्यमातून शाळेत प्रात्यक्षिकांचे धडे गिरवण्याचे काम सुरू झाले आहे. त्यातून विद्यार्थी व पालकांचा शेती व शेती व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवून विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात कृषी ज्ञान आत्मसात करावे असे आवाहन अशोक नांदुलकर यांनी केले.

     



महागाव येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये फाली ( फ्युचर एग्रीकल्चर लीडरशिप ऑफ इंडिया) संस्थेच्या वतीने दोन वर्ष अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरणाप्रसंगी बोलत होते.यावेळी प्रा.पी. डी. पाटील, शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष अनिल हलकर्णीकर उपस्थित होते.



प्रास्ताविक समन्वयक प्रथमेश शेळके यांनी केले. यावेळी बोलताना प्रा. पी.डी. पाटील म्हणाले, भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. देशातील पुढच्या पिढीने शेतीकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलावा व शेतीकडे आकर्षित व्हावे. तसेच पारंपरिक शेती न करता अधुनिक शेती करावी. फाली या उपक्रमामध्ये शाळेतील आठवी व नववीमधील प्रत्येकी ४० अशा एकूण ८० विद्यार्थ्यांना या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतले जाते. यावेळी नववी पास झालेल्या व दोन वर्ष कोर्स पूर्ण केलेल्या ४० विद्यार्थ्यांना पारितोषिक करण्यात आले. 

    


यावेळी भिमराव भुईंबर, सुभाष सुतार, संदेश कोकितकर, एकता पाटील, रमेश कळविकट्टे, कुलदिप देसाई, सुवर्णा शेवाळे, किरण पाटील, लता देसाई,शांताराम वाघराळकर, शिवाजी सुतार, नरसू कांबळे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश चौगुले यांनी केले. महेश पाटील यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.