मनसेचे जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले यांचे पंचायत समितीला निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): मौजे शिप्पूर तर्फ आजरा (ता. गडहिंग्लज) येथे स्मशान शेड अभावी ग्रामस्थांची गैरसोय होत असून पुन्हा तातडीने मंजूर करावे अशी मागणी मनसेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले यांनी गटविकास अधिकारी शरद मगर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, मौजे शिप्पूर तर्फ आजरा गावामध्ये यापूर्वी दोन वेळा स्मशान शेड मंजूर झाले होते. परंतु काही लोकांच्या विरोधामुळे स्मशानशेडचे काम पूर्ण झाले नाही. पावसाळ्यात गावामध्ये कोणी मयत झाल्यास अंत्यविधी करताना मोठी अडचण निर्माण होते. ही अडचण लक्षात घेऊन तात्काळ स्मशान शेड मंजूर करावे अशी मागणी या निवेदनातून केली आहे. अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले, मनविसे जिल्हा अध्यक्ष प्रभात साबळे, शहर अध्यक्ष केंप्पाना कोरी, संघटक विश्वनाथ रायकर, प्रभाकर केसरकर, अविनाश चाळक, अभिजित जाधव, प्रतीक रायकर, शुभम पाटील उपस्थित होते.


