मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधान भवनात आगमन झाले. त्यांनी सर्वप्रथम विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ, मंत्री धनंजय मुंडे, खासदार सुनील तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री सुनील बनसोडे, मंत्री अनिल पाटील यांच्यासह सहकारी आमदार उपस्थित होते.


