Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मंत्री पदाची शपथ घेतलेल्या नव्या ९ मंत्र्यांचा परिचय

 



पवार अजित अनंतराव




जन्म : २२ जुलै, १९५९.

जन्म ठिकाण : देवळाली-प्रवरा, तालुका-राहुरी, जिल्हा -अहमदनगर.

शिक्षण : बी.कॉम.

वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी सुनेत्रा .

अपत्ये : एकूण २ (दोन मुलगे).

व्यवसाय : शेती.

पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.

मतदारसंघ : २०१-बारामती, जिल्हा -पुणे.


इतर माहिती : विश्वस्त, विद्या प्रतिष्ठान, बारामती; सदस्य, रयत शिक्षण संस्था, सातारा; संचालक, छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, तालुका इंदापूर; संचालक, श्री. छत्रपती सहकारी साखर कारखाना, लि. भवानीनगर; संचालक, माळेगाव सहकारी साखर कारखाना, लि.; संचालक, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, लि. जिल्हा पुणे; संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, मुंबई; संचालक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट , पुणे; मार्च, १९९१ ते ऑगस्ट, १९९१ तसेच डिसेंबर, १९९४ ते डिसेंबर, १९९८ अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक; ११ डिसेंबर, १९९८ ते १७ ऑक्टोबर, १९९९ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई; १९ डिसेंबर, २००५ पासून संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ; संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई; २८ सप्टेंबर, २००६ पासून अध्यक्ष , पुणे जिल्हा शिक्षण मंडळ; मार्च, २०१३ पासून अध्यक्ष, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन; सप्टेंबर, २००५ ते २३ मार्च, २०१३ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन; १३ ऑगस्ट, २००६ ते १९ ऑगस्ट, २०१८ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन; १७ जून, १९९१ ते १८ सप्टेंबर, १९९१ सदस्य, लोकसभा; १९९१-९५ (पो.नि .), १९९५-९९, १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४- २०१९ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; २८ जून, १९९१ ते नोव्हेंबर, १९९२ कृषी, फलोत्पादन व ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री ; नोव्हेंबर, १९९२ ते फेब्रुवारी, १९९३ जलसंधारण, ऊर्जा व नियोजन खात्याचे राज्यमंत्री; २७ ऑक्टोबर, १९९९ ते २५ डिसेंबर, २००३ पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे), फलोत्पादन खात्याचे मंत्री; २६ डिसेंबर, २००३ ते ३१ ऑक्टोबर, २००४ ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे (कृष्णा खोरे कोकण पाटबंधारे महामंडळे) खात्याचे मंत्री; ९ नोव्हेंबर, २००४ ते ७ नोव्हेंबर, २००९ जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून), लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री; ७ नोव्हेंबर, २००९ ते ९ नोव्हेंबर, २०१० जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून) व ऊर्जा खात्याचे मंत्री; ११ नोव्हेंबर, २०१० ते सप्टेंबर, २०१४ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन आणि ऊर्जा ); ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड; २२ डिसेंबर, ते २७ डिसेंबर, २०१९ उपमुख्यमंत्री; ३० डिसेंबर, २०१९ पासून उपमुख्यमंत्री. (वित्त व नियोजन) ६ एप्रिल, २०२१ ते जून २०२२ अखेर राज्य उत्पादन शुल्क खात्याचा अतिरिक्त कार्यभार. ५ जुलै २०२२ पासून विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदी निवड.



भुजबळ छगन चंद्रकांत




जन्म: १५ ऑक्टोबर १९४७.

जन्म ठिकाण: नाशिक.

शिक्षण: एल.एम.ई. (आय), (मेकॅनिकल इंजिनिअर).

ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी.

वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी मीना.

अपत्ये: एकूण १ (एक मुलगा).

व्यवसाय_: शेती.

पक्ष: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.

मतदारसंघ : ११९-येवला, जिल्हा -नाशिक.



इतर माहिती : संस्थापक-अध्यक्ष , मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट, बांद्रा, मुंबई; माजी विश्वस्त, व्हि . जे. टी. आय. संस्था, मुंबई; विश्वस्त,नायर रुग्णालय; विश्वस्त, प्रिन्स आगास्थान रुग्णालय, मुंबई; संस्थापक, महात्मा फुले समता परिषद, या संस्थेमार्फत उपेक्षित पद-दलित, मागासवर्गी यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न तसेच महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहु महाराज यांच्या विचारांचा व आदर्शांचा प्रचार व प्रसार; ५ नोव्हेंबर २०१० रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना मुंबई भेटीदरम्यान महात्मा फुले यांनी लिहिलेल्या “गुलामगिरी” या पुस्तकाचा “स्लेव्हरी” हा अनुवादीत ग्रंथ भेट दिला; माजी विश्वस्त, मुंबई पोर्ट-ट्रस्ट; १९८५ “दैवत” व १९९० “नवरा बायको” या मराठी चित्रपटांची निर्मिती; १९७३ सदस्य, १९७३-८४ विरोधी पक्षनेते, १९८५ व १९९१ महापौर, मुंबई महानगरपालिका; या काळात गृहनिर्माण, झोपडपट्टी सुधारणा, मुंबई शहराचे सौंदर्यीकरण, चौकांचे सुशोभिकरण, हुतात्मा चौकाचे सुशोभिकरण केले; १९९१अध्यक्ष , ऑल इंडिया कौन्सिल ऑफ मेयर्स; १९९१ पर्यंत शिवसेनेत विविध पदावर कार्य; १९९१ नंतर काँग्रेस पक्षात कार्यरत; जून १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य ; संस्थापक-सदस्य व जून १९९९ ते नोव्हेंबर १९९९ महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष; १९८५-९०, १९९०-९५, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; १९९६-२००२ व २००२-२००४ सदस्य, महाराष्ट्र विधानपरिषद; डिसेंबर १९९१ ते मार्च १९९३ महसूल खात्याचे मंत्री; मार्च १९९३ ते मार्च १९९५ गृहनिर्माण, गलिच्छ वस्ती सुधार, घरदुरुस्ती आणि पुनर्बांधणी खात्याचे मंत्री; १९९६-१९९९ विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानपरिषद; ऑक्टोबर १९९९ ते जानेवारी २००३ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृह आणि पर्यटनमंत्री, नोव्हेंबर १९९९ ते जानेवारी २००३ मुंबई शहराचे पालकमंत्री; जानेवारी २००३ ते डिसेंबर २००३ उपमुख्यमंत्री व गृहमंत्री; नोव्हेंबर २००४ ते ऑक्टोबर २००९ सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या खात्यांचे मंत्री; नोव्हेंबर २००९ ते नोव्हेंबर २०१० दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) खात्याचे मंत्री; नोव्हेंबर २०१० ते सप्टेंबर २०१४ सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री; या काळात दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनाची अत्यंत देखणी अशी महाराष्ट्राला भूषणावह ठरणारी वास्तु उभी केली; ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड; जानेवारी २०२० ते जून २०२२ अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री . 



वळसे-पाटील दिलीप दत्तात्रय




जन्म : ३० ऑक्टोबर, १९५६.

जन्म ठिकाण : निरगुडसर, तालुका-आंबेगांव, जिल्हा -पुणे.

शिक्षण : बी.ए. (ऑनर्स ), डी.जे., एलएल.एम्.

वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी किरण.

अपत्ये: एकूण १ (एक मुलगी).

व्यवसाय: शेती व व्यापार.

पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.

मतदारसंघ : १९६-आंबेगाव, जिल्हा -पुणे.


इतर माहिती : महाविद्यालयीन जीवनापासूनच राजकारणात सक्रीय सहभाग; सहकारी चळवळीमध्ये राज्यातील अभ्यासु नेत्यासोबत राहुन सक्रीय सहभाग; संस्थापक-अध्यक्ष , राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र, पुणे, या संस्थेमार्फत ग्रामीण, दुर्गम आदिवासी भागातील जनतेच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी विविध उपक्रम राबविले; ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायास प्रोत्साहन देऊन संस्थांचे जाळे विकसित केले; ग्रामीण भागातील महिला वर्गाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न; विश्वस्त, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई; महाराष्ट्रातील अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांशी निकटचा संबंध; संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक; संस्थापक-चेअरमन, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना; १९९०-१९९५, १९९५-१९९९, १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; १९९२-१९९३ समिती प्रमुख, विधिमंडळ अंदाज समिती; राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे सन १९९७-१९९८ मध्ये महाराष्ट्र विधानसभेतील “उत्कृष्ट संसदपटू” या पुरस्काराने सन्मानित; ऑक्टोबर १९९९ ते डिसेंबर, २००२ उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री; डिसेंबर, २००२ ते जानेवारी २००३ उच्च व तंत्रशिक्षण आणि ऊर्जा खात्याचे मंत्री; जानेवारी २००३ ते नोव्हेंबर २००४ ऊर्जा व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री; नोव्हेंबर २००४ ते मार्च २००५ ऊर्जा (अपारंपरिक ऊर्जा वगळून) व वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री ; मार्च २००५ ते डिसेंबर २००८ ऊर्जा (अपारंपरिक ऊर्जा वगळून), वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री; डिसेंबर २००८ ते ऑक्टोबर, २००९ वित्त व नियोजन खात्याचे मंत्री; मंत्रीपदी कार्यरत असताना महत्वपूर्ण धोरणात्मक व उल्लेखनीय निर्णय घेतले, त्यामध्ये प्रामुख्याने ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळ’ या कंपनीची स्थापना करुन गतीने विकास केला, त्यामुळे राज्यात संगणक साक्षरता वाढीचे महत्वाचे कार्य होऊ शकले; विद्युत कायदा २००३ ची राज्यात प्रभावी अंमलबजावणी केली; ऊर्जा क्षेत्रात राज्याला योग्य दिशा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे विभाजन करुन सुत्रधारी कंपनी, महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या चार कंपन्यांची स्थापना केली व ऊर्जा विकासासाठी रोडमॅप केला, ६००० मेगावॅटचे प्रकल्प उभारण्याचे व विद्युत पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम केले; २००९-२०१४ अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा; या काळात विधानमंडळाचे कामकाज योग्य पध्दतीने चालावे यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले; २०१२-२०१३ मध्ये महाराष्ट्र विधानमंडळाच्या अमृत महोत्सव समारंभाचे भारताच्या राष्ट्रपती महामहिम प्रतिभाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन केले; तसेच यशवंतराव चव्हाण व वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी निमित्त अमरावती, नागपूर, औरंगाबाद व मुंबई येथे प्रदर्शन व चर्चा सत्रांचे आयोजन; ऑक्टोबर, २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड; जानेवारी २०२० ते ५ एप्रिल २०२१ कामगार व राज्य उत्पादनशुल्क खात्याचे मंत्री. ६ एप्रिल २०२१ ते जून 2022 गृह खात्याचे मंत्री .



मुश्रीफ हसन मियालाल




जन्म : २४  मार्च , १९५४.

जन्म ठिकाण : कागल, जिल्हा-कोल्हापूर.

शिक्षण : बी.ए. (ऑनर्स ).

वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी साहेरा.

अपत्ये : एकूण ४ (तीन मुलगे व एक मुलगी).

व्यवसाय : शेती.

पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.

मतदारसंघ : २७३-कागल, जिल्हा -कोल्हापूर.


इतर माहिती : विद्यार्थी चळवळीत सक्रीय सहभाग; अध्यक्ष, आदर्श शिक्षण संस्था, कागल; अध्यक्ष, भाई माधवराव बागल शिक्षण संस्था, कोल्हापूर; अध्यक्ष , नागनाथ शिक्षण संस्था, एकोंडी; संस्थापक-अध्यक्ष, छत्रपती शिवाजी सहकारी सोसायटी, कागल; शेतकरी, दुर्बल घटक व मागासवर्गीय यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील; महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात सक्रीय सहभाग; शेतकरी संघटनेच्या तंबाखू व दूध दरवाढ आंदोलनात सहभाग; सदस्य व १९९७-९८ सभापती, पंचायत समिती, कागल; सदस्य, जिल्हा परिषद, कोल्हापूर; १९८६-२०१५ संचालक, काही काळ व्हाईस चेअरमन व चेअरमन, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, या बँकेच्या माध्यमातून अनेक नाविण्यपूर्ण योजना सभासदांच्या हितार्थ राबविल्या. त्यामुळे शासनाने या बँकेचा विशेष गौरव केला; अध्यक्ष , संजय गांधी निराधार योजना, कागल; संचालक व उपाध्यक्ष , महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ मर्या (महानंद), गोरेगाव, मुंबई; व्हाईस चेअरमन, खा. सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखाना, हमीदवाडा; सदस्य, कागल तालुका खरेदी विक्री संघ; संस्थापक -संचालक, छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लि . कागल; व्हाईस चेअरमन, कागल तालुका सह. सूत गिरणी मर्या . चेअरमन, शरद सहकारी सूत गिरणी मर्या; सहकारी कागल; संचालक, कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी उद्योग सहकारी संस्था; उपाध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी; १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य; प्रदेश उपाघ्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष; १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; मार्च, २००१ ते जुलै, २००४ पशुसंवर्धन व दुग्धविकास खात्याचे राज्यमंत्री; जुलै, २००४ ते ऑक्टोबर, २००८ पशुसंवर्धन, दुग्धविकास, शालेय शिक्षण, औकाफ खात्यांचे राज्यमंत्री; नोव्हेंबर, २००८ ते नोव्हेंबर, २००९ नगरविकास, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्य व्यवसाय, अल्पसंख्याक, औकाफ, विधी व न्याय खात्याचे राज्यमंत्री ; नोव्हेंबर, २००९ ते जून, २०१४, कामगार खात्याचे मंत्री ; २७ जून, २०१४ ते ऑक्टोबर, २०१४ जलसंपदा (कृष्णा खोरे महामंडळ) खात्याचे मंत्री ; ऑक्टोबर, २०१९ मध्ये विधानसभेवर फेरनिवड; जानेवारी, २०१९ ते जून २०२२ ग्रामविकास खात्याचे मंत्री.



मुंडे धनंजय पंडितराव




जन्म : १५ जुलै, १९७५.

जन्म ठिकाण : नाथ्रा, पो. कोठळी, तालुका परळी-वैजनाथ, जिल्हा बीड.

शिक्षण : बी.एस्.एल.

वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी राजश्री.

अपत्ये : एकूण २ (दोन मुली).

व्यवसाय : शेती, व्यापार व समाजसेवा.

पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.

मतदारसंघ : २३३-परळी, जि. बीड.


इतर माहिती : अध्यक्ष , नाथ प्रतिष्ठान, परळी-वैजनाथ, या संस्थेमार्फत सामुहिक विवाहांचे आयोजन; वृक्ष लागवड, आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन; विविध क्रीडा स्पर्धांचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन; विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तुंचे वाटप; २००३ मध्ये घाटनांदूर येथील रेल्वे अपघातात १२ जणांचे प्राण वाचविले; ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी अनेक गावात २०० पेक्षा अधिक विंधन विहिरी घेतल्या ; २००१ मध्ये बेरोजगार व दहशतवाद विरोधी युवक मोर्चा ; २००८ दिल्ली येथील युवाक्रांती रॅलीत महाराष्ट्रातील युवकांचे नेतृत्व; १४ वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय २००९ मध्ये पुणे येथे युवा संकल्प रॅलीचे आयोजन केले; १९९७ -१९९८ भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी आघाडीचे प्रमुख; १९९८-२००१ उपाध्यक्ष व २००१-२००७ सरचिटणीस व २००७-२०१० अध्यक्ष , भारतीय जनता युवा मोर्चा ; नोव्हेंबर, २०१४ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य ; २००२- २००७ सदस्य, २००७-२०१० उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, बीड; संचालक, संत जगमित्र सहकारी सुतगिरणी मर्यादित, टोकवाडी, परळी- वैजनाथ; २०१०-२०१६, २०१६-२०१९ सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद; डिसेंबर, २०१४ ते ऑक्टोबर, २०१९ विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधान परिषद; ऑक्टोबर, २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवड; जानेवारी, २०२० जून २०२२ सामाजिक न्याय व विशेष सहाय खात्याचे मंत्री .



आत्राम धर्मरावबाबा भगवंतराव




जन्म : २० ऑक्टोबर, १९५३. 

जन्म ठिकाण : अहेरी, जिल्हा गडचिरोली. 

शिक्षण : एस.एस.सी. 

ज्ञात भाषा : मराठी , हिंदी , इंग्रजी, गोंडी, माडिया व तेलगु. 

वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी स्नेहादेवी. 

अपत्ये : एकूण- ३(एक मुलगा व दोन मुली). 

व्यवसाय : शेती व व्यापार. 

पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष . 

मतदारसंघ : ६९ - अहेरी (अनुसूचित जमाती), 

जिल्हा -गडचिरोली. 



इतर माहिती : सन १९९१ सचिव, भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था, अहेरी; उपाध्यक्ष; पुष्पप्रिया देवी शिक्षण मंडळ, अहेरी; १९८६ उपाध्यक्ष, वन वैभव शिक्षण मंडळ, आलापल्ली, या संस्थेमार्फत १०० शाळा व महाविद्यालये, आश्रमशाळा, सैनिकी शाळा, पोस्ट बेसिक आश्रम शाळा, डी.एड.कॉलेज, ज्युनिअर कॉलेज सुरू करून गडचिरोली जिल्ह्यातील अतिदूर्गम भागातील मुलांच्या शिक्षणाची सोय केली; २००१-२००४ मध्ये नेत्रचिकित्सा शिबीरात १०,५०० जणांवर नेत्र चिकित्सा केली; वेस्टर्न झोन सुटींग स्पर्धेत प्रथम क्रमांक, बाफना पुरस्कार प्राप्त. २००४-२००६ सिकलसेल आत्राम, श्री. धर्मरावबाबा भगवंतराव १४ वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय 23 तपासणी शिबीराचे आयोजन; कुपोषण कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न; १९८२-८५ अध्यक्ष, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी; १९७८ सदस्य, ग्रामपंचायत, अहेरी; १९८०-१९८२ सभापती, पंचायत समिती, अहेरी; १९९५ सदस्य, जिल्हा परिषद, गडचिरोली; १९९०-९५,१९९९- २००४, २००४-२००९, सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; जून, १९९१ ते मार्च, १९९३ आदिवासी विकास, वने आणि सामाजिक वनीकरण खात्याचे राज्यमंत्री; जुलै, २००२ ते जुलै, २००४ आदिवासी विकास खात्याचे राज्यमंत्री; नोव्हेंबर, २००४ ते ऑक्टोबर, २००९ परिवहन, सामाजिक न्याय, विमुक्त भटक्या जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण व खनिकर्म खात्याचे राज्यमंत्री; ऑक्टोबर, २०१९ मध्ये महाराष्ट्र विधान सभेवर फेरनिवड. 



तटकरे कुमारी आदिती सुनिल




जन्म : १६ मार्च , १९८८.

जन्म ठिकाण : मुंबई.

शिक्षण : एम. ए., डिप्लोमा इन एच्. आर.

वैवाहिक माहिती : अविवाहित.

व्यवसाय : सामाजिक कार्य .

पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.

मतदारसंघ : १९३ - श्रीवर्धन, जिल्हा रायगड.

इतर माहिती : सन २००८-२००९ प्राध्यापिका, जयहिंद कॉलेज; सन २००८-२००९ यु.पी.एस.सी. परीक्षेच्या पर्यवेक्षिका; २०१० संघटक, कोकण विभाग राष्ट्रवादी युवती काँग्रेस; २०१७-२०१९ सदस्या तसेच मार्च , २०१७ ते नोव्हेंबर, २०१९ अध्यक्षा ; जिल्हा परिषद, रायगड; सन २०१७ मध्ये हिरकणी पुरस्काराने सन्मानित; ऑक्टोबर, २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवड; जानेवारी, २०२० ते जून २०२२ उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क खात्याच्या राज्यमंत्री. 



बनसोडे संजय बाबुराव




जन्म : १ जुलै, १९७३

जन्म ठिकाण : लातुर.

शिक्षण : एच.एस.सी (सायन्स).

वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी शिल्पा .

अपत्ये : एकूण २ (एक मुलगा व एक मुलगी).

व्यवसाय : शेती.

पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.

मतदारसंघ : २३७-उदगीर (अनुसूचित जाती), जिल्हा -लातूर.

इतर माहिती : सन १९९२ पासून विद्यार्थी चळवळीत सहभाग; १९९३ मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात सक्रीय सहभाग; सांस्कृतिक व साहित्यिक कार्यात सहभाग; २००४ सदस्य, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ; १९९४ युवक काँग्रेस उपाध्यक्ष ; १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य ; २००४ जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष; २००६ पासून सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष; २०१४ लातूर आयकॉन पुरस्कार प्राप्त; जैन समाज भूषण पुरस्काराने सन्मानित; ऑक्टोबर, २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवड; जानेवारी, २०१९ ते जून २०२२ सामाजिक न्याय, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी योजना, पर्यावरण, पाणीपुरवठा स्वच्छता, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य खात्याचे राज्यमंत्री .



पाटील अनिल भाईदास




जन्म : ७ जुलै, १९६८.

जन्म ठिकाण : जळगाव.

शिक्षण : एम.कॉम., डी.एलएल. अँड एल.डब्लू .

वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी जयश्री.

अपत्ये : एकूण २ (एक मुलगा व एक मुलगी)

व्यवसाय : शेती.

पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.

मतदारसंघ : १५-अमळनेर, जिल्हा जळगाव.

इतर माहिती : सन २००२-२००७ व २००७-२०१२ सदस्य, जिल्हा परिषद, जळगाव; सन २००४ ते २०१४ सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर; २०१० पासून संचालक, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि .; माजी जिल्हा अध्यक्ष, भारतीय जनता पक्ष; सन २०१९ पासून प्रदेश

कार्यकारणी सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष; प्रतोद, विधीमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष; ऑक्टोबर, २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवड.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.