ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने प्रांताधिकार्यांना निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): उद्योजक संतोष शिंदे, त्यांची पत्नी तेजस्विनी, मुलगा अर्जुन यांच्या तिहेरी आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या संशयितांची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज येथील अर्जुन उद्योग समूहाचे प्रमुख व युवा उद्योजक संतोष शिंदे यांनी सध्या अटकेत असलेल्या त्या माजी नगरसेविका व तिचा साथीदार पोलीस अधिकारी या दोघांच्या खंडणीच्या त्रासाला कंटाळून पत्नी मुलासह आत्महत्या केली आहे. त्यामुळे अटकेतील या दोघाही संशयितांना कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी त्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनावर उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी, संभाजी येरुडकर, आर.एस.खवणे, आनंदा माने आदींच्या सह्या आहेत.

