गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष व युवा सेनेच्या वतीने अश्लील व्हिडिओ प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांचा निषेध करण्यात आला. शहर कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी किरीट सोमय्या याच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. सोमय्यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांचा निषेध नोंदविण्यात आला. सोमय्या याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशा लोकांना महाराष्ट्रात राहू देऊ नये आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख संतोष चिकोडे, युवा सेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील, रियाज शमनजी, महिला शहर संघटिका रेखा पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख सागर हेबाळे, शिवसेना उप तालुकाप्रमुख भरत जाधव, वसंत नाईक, उपशहर प्रमुख संदीप कुराडे, रवी पाटील, प्रशांत गबाडे, उपशहर प्रमुख बाळू कुंभार, उपशहर प्रमुख महिला आघाडी सुनीता पाटील, स्वरूपा पेंढुरकर, रुक्मिणी देवुगडे, प्रियंका वेळे, सुमया मुल्ला, विभाग प्रमुख अजित खोत, केदार डांग, तेजस घेवडे, सोमनाथ मुदकनावर, झोपडपट्टी संघटना प्रमुख सुनील डवरी, आकाश नाईक, आकाश भोई, आकाश इंजल यांच्यासह शिवसैनिक, युवा सैनिक उपस्थित होते.
बातमीचा व्हिडिओ येथे पहा 👇🏼



