Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णीत 11 फेब्रुवारीला हत्तरकी गटाचा भव्य मेळावा

वीरशैव बॅंकेचे चेअरमन सदानंद हत्तरकी व व्हॉइस चेअरमन चंद्रकांत सांगावकर यांचा होणार नागरी सत्कार 



गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे रविवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता हत्तरकी गटाचा भव्य मेळावा व वीरशैव को ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल सदानंद हत्तरकी व व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल चंद्रकांत सांगावकर यांचा नागरी सत्कार समारंभ असा संयुक्त कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम हलकर्णी भाग हायस्कूल येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमास नूल येथील सुरगीश्वर मठाचे श्री गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी व कर्नाटकातील हत्तरगी येथील कारीमठचे श्री गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.


वीरशैव बँकेच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल सदानंद हत्तरकी व व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल चंद्रकांत सांगावकर यांचा माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या श्रीमती रेखाताई हत्तरकी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी गुणवंत विद्यार्थी तसेच नवनिर्वाचित तलाठी यांचा देखील सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे  असे आवाहन संयोजक समाजसेवक डॉ. गंगाधर व्हसकोटी व तालुका संघाचे माजी चेअरमन वरदशंकर वरदापगोळ यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.