Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नूल येथील सुरगीश्वर मठाच्या सांस्कृतिक भवनाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार भूमिपूजन

आमदार राजेश पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती


सांस्कृतिक भवनसाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध


 10 फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजन 


गडहिंग्लज : पत्रकार परिषदेत माहिती देताना आमदार राजेश पाटील. शेजारी श्री गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी.

गडहिंग्लज (प्रतिनिधी):
नूल (ता. गडहिंग्लज) येथील सुरगीश्वर मठाच्या  सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते शनिवारी दि १० फेब्रुवारी रोजी करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राजेश पाटील यांनी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. हा कार्यक्रम सकाळी आठ वाजता न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या संस्कृतीक भवनसाठी आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेत सुरगीश्वर मठाचे श्री गुरूसिद्धेश्वर महास्वामीजी यांची उपस्थिती होती.



यावेळी माहिती देताना आमदार पाटील म्हणाले, 'सुरगीश्वर मठाचे परमपूज्य  श्री गुरूसिद्धेश्वर महास्वामींच्या मार्गदर्शनाखाली मठ कार्यरत आहे. या मठातील भवन संकुलासाठी साडेपाच कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात  सांस्कृतिक सभागृहासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते त्या कामाचे भूमिपूजन केले जाणार आहे. या कार्यक्रमास  पालकमंत्री हसन मुश्रीफ, कृषी मंत्री धनजंय मुंडे, खासदार संजय मंडलिक यांची उपस्थिती असणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा नागरी सत्कार देखील करण्यात येणार आहे. त्याबरोबरच या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकरी मेळावा देखील आयोजित केल्याचे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमास शेतकऱ्यांसह जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.


यावेळी गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी मठाच्या विकासासाठी आमदार पाटील यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. संघटक जयसिंग चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाबाबतची माहिती दिली. या पत्रकार परिषदेस माजी जिल्हा परिषद सदस्य जयकुमार मुन्नोळी, रामाप्पा करिगार, बाबासाहेब पाटील, अभय देसाई, महाबळेश्वर चौगुले, लक्ष्मण तोडकर, मुन्नासो नाईकवाडी, अमर हिडदुग्गी, बशीर पठाण, सागर देसाई, पी. एम. चव्हाण यांच्यासह इतर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.