Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणीच्या उपसरपंच पदी सौ. सोनव्वा कतिगार यांची निवड

तेरणी : नूतन उपसरपंच सौ. सोनव्वा कतिगार यांचा सत्कार करताना ग्रामपंचायत सदस्या श्रीमती अक्काताई हजेरी. यावेळी उपस्थित सरपंच करवीर उथळे, सदस्य मोसीम मुल्ला, रमेश पुजेरी, नागराज पाटील, अर्जुन कांबळे, सौ. दीपा नरेवाडी, सौ. अंजना निंबाळकर, ग्रामसेवक निवृत्ती कोंडुस्कर.  


गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ. सोनव्वा मारुती कतिगार यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षस्थानी सरपंच करवीर उथळे होते. ग्रामपंचायत  निवडणुकीनंतर पाच वर्षात सर्वांना समान संधी देण्याचे ठरवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर रोटेशन पद्धतीने ही उपसरपंच निवड झाली.




उपसरपंच पदासाठी सौ. सोनव्वा कतिगार यांचे नाव सदस्या सौ. अंजना निंबाळकर यांनी सुचविले त्यास सदस्य रमेश पुजेरी यांनी अनुमोदन दिले. यावेळी माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सौ. दीपा नरेवाडी, मोसीम मुल्ला, रमेश पुजेरी, बसवराज बुध, नागराज पाटील, अर्जुन कांबळे, सौ. करिष्मा मुल्ला, सौ. अंजना निंबाळकर, श्रीमती अक्काताई हजेरी, सौ. मंजुळा चौगुले, ग्रामसेवक निवृत्ती कोंडुस्कर, कर्मचारी सुरेश भोई, रहेमान तशिलदार, करवीर भोई, सिद्धाप्पा धनगर, तानाजी सुतार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. निवडीनंतर फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.