गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी ता (गडहिंग्लज) येथे गुरुवारी माही निमित्त कोल्हापूर येथील निर्माता शशिकांत मोरे यांचा सुप्रसिद्ध हंगामा आर्केस्ट्राचे (तुफान विनोदी कौटुंबिक हृदयस्पर्शी नाटिका 'सुखाची सावली सौभाग्याची') आयोजन करण्यात आले आहे.
हलकर्णी भाग हायस्कूल येथे रात्री १० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या आर्केस्ट्राचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन महालक्ष्मी कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

