Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शोषणमुक्त समाजासाठी ग्राहक प्रबोधन गरजेचे : प्रा. योगेश पाटील

गडहिंग्लज येथील जागृती हायस्कूलमध्ये जागतिक ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रम



गडहिंग्लज : जागृती हायस्कूल येथे जागतिक ग्राहक दिनानिमित्त बोलताना प्रा. योगेश पाटील. यावेळी उपस्थित उप मुख्याध्यापक उमेश सावंत, श्रीमती डायना बार्देस्कर.




गडहिंग्लज (प्रतिनिधी): विद्यार्थी हा ग्राहक असून त्यांना हक्क आणि कर्तव्याची जाणीव झाल्यास बलशाली भारतासाठी जबाबदार नागरिक सहजपणे करता येईल. आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे. यासाठी त्यांना ग्राहकांचे मूलभूत अधिकार माहिती असणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन प्रा. योगेश पाटील यांनी केले.


गडहिंग्लज येथील जागृती हायस्कूलमध्ये जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उप मुख्याध्यापक उमेश सावंत होते. स्वागत व प्रास्ताविक प्रकाश हारकारे यांनी केले.





यावेळी बोलताना प्रा. पाटील पुढे म्हणाले, जागतिकीकरणाच्या युगात प्रत्येक नागरिक हा ग्राहक बनला आहे. देश आणि समाजाच्या कल्याणासाठी ग्राहक जागरूक असणे आवश्यक आहे. ग्राहक कायद्याचे ज्ञान शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. शासन पातळीवर सुद्धा ग्राहकांच्या प्रबोधनासाठी अनेक महत्त्वाचे उपक्रम राबविले जातात. शोषणमुक्त समाजासाठी ग्राहकांना प्रबोधन करणे काळाची गरज आहे. यावेळी उप मुख्याध्यापक उमेश सावंत यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.




यावेळी मुख्याध्यापक विजयकुमार चौगुले, पर्यवेक्षक शिवाजी अनावरे, अनिल मसाळे, महंतेश दड्डी यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती डायना बार्देस्कर यांनी केले. आभार विलास वसावे यांनी मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.