
भडगाव : लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करताना सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक. यावेळी उपस्थित आरोग्य विभागाचे कर्मचारी.
गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आज येथील विविध केंद्रांवर ० ते ५ वयोगटातील बालकांना हा डोस पाजण्यात येत आहे.
येथील सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक यांनी कालपासून पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेबाबत गाव, वाड्या वस्त्यांवरील नागरिकांमध्ये जनजागृती करत बालकांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले होते. भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय,जुनी मराठी शाळा, बंगला स्टाॅप, समर्थनगर, चोथेवाडी, बेरडवाडी या भागातील अंगणवाडी शाळामधील केंद्रावर लस उपलब्ध आहे. तरी नागरिकांनी आपल्या घरातील 0 ते ५वर्षाखालील लहान मुलांना पोलिओ डोस पाजून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. सकाळपासून लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला आहे.
यामध्ये आरोग्यसेविका, आशा अंगणवाडी सेविका काम करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक यांनी सर्व लसीकरण केंद्राला भेटी देऊन पोलिओ लसीकरण मोहीम बाबत जनजागृती केली.
![]() |
| भडगाव : लसीकरण मोहिमेपासून गाव व वाडी वस्तीवरील एकही बालक वंचित राहू नये यासाठी सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक यांनी वार्ता फलकावर अशी जनजागृती केली होती. |



