Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गुरव समाजासाठी यापुढे काम करणार : कुमार गुरव

गडहिंग्लज तालुक्यातील गुरव समाजाकडून सेवानिवृत्तीबद्दल सत्कार





मुगळी (वार्ताहर) : गेली 28 वर्ष चंदगड तालुक्यामध्ये ज्ञानदानाचे काम केले. यापुढे आपल्या गडहिंग्लज तालुक्यातील गुरव समाजासाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन चंदगड तालुक्यातील शिक्षक कुमार गुरव यांनी केले.



गडहिंग्लज तालुक्यातील गुरव समाजाकडून सेवा निवृत्तीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबुराव गुरव होते. स्वागत सुभाष गुरव यांनी केले. यावेळी कुमार गुरव व सौ शैला गुरव यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन विश्वनाथ गुरव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



यावेळी अध्यक्ष सुनिल गुरव, संजय गुरव, अजित गुरव, सातलिंग गुरव, बाबुराव गुरव, विश्वनाथ गुरव, सुभाष गुरव, श्रीपाद स्वामी, मनोहर गुरव यांच्यासह गडहिंग्लज तालुक्यातील गुरव समाज बांधव उपस्थित होते. आभार सातलिंग गुरव यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.