Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विज्ञान शिक्षकांनी आपली ऐतिहासीक जबाबदारी समर्थपणे सिद्ध आणि साध्य करावी!

शिवराज विद्या संकुलचेअध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. किसनराव कुराडे  यांचे मत     





गडहिंग्लज (प्रतिनिधी): आवाजाला आकार देऊन त्याचे शब्दात रुपांतर करून हजारो भाषांचा शोध लावणाऱ्या आणि त्याच बरोबर पृथ्वीतलावरील सजीव सृष्टीमध्ये सर्वोच्च स्थान प्राप्त करून घेणाऱ्या मानवजातीच्या भूतकाळातील प्रत्येक पिढी अनेक साधने आणि सुविधा यांची लाभधारक ठरलेली आहे. हिच परंपरा अखंड ठेवून आजच्या वैज्ञानिक शिक्षकांनी आपली ऐतिहासिक जबाबदारी पार पाडावी. शंभर वर्षापूर्वी स्वप्नातही शक्य नाही असे वाटणाऱ्या अनेक गोष्टी शास्त्रज्ञांनी सिद्ध आणि साध्य करून दाखविलेले आहे. टेलिफोनपासून ते टेलिव्हिजन पर्यंत हँडसेटपासून वॉटसपपर्यंत अशी प्रत्येक क्षेत्रात अनेक साधने शोधलेली आहेत. म्हणूनच आजच्या पिढीने अध्यात्म्याशी सांगड घालून माइंडसेटचा शोध लावावा असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक सीतायणकार प्रा.किसनराव कुराडे यांनी केले.




शाहू सभागृह कोल्हापूर येथे विज्ञानदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्रातील चाळीस वैज्ञानिक शिक्षकांना सन्मानीत करण्याच्या या समारंभामध्ये अध्यक्षपदावरून ते बोलत होते. या समारंभामध्ये महाराष्ट्रातील थोर विचारवंत व संशोधक प्रा.डॉ.सुरेंद्र हेरकर  यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या  कार्यक्रमाला नागपूरपासून ते कोल्हापूरपर्यंत आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत शेकडो विज्ञान शिक्षक–शिक्षिका उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन श्री रंगराव सूर्यवंशी यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.