Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कित्तुरकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केली पथनाट्यद्वारे मतदार जनजागृती

हलकर्णी, कडलगे, नेसरी, महागाव, बटकंणगले येथे सादर केले पथनाट्य 


चंदगड मतदारसंघातील विविध गावांमध्ये याद्वारे जनजागृती सुरू 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी पंचायत समिती शिक्षण विभाग आणि रावसाहेबआण्णा कित्तुरकर  जयुनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे जनजागृती केली. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो! अशा घोषणा देत मतदारांना मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली.




कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील 271 चंदगड मतदारसंघात सध्या जनजागृतीची मोहीम जोरात सुरू आहे. गडहिंग्लज मधील रावसाहेबअण्णा कित्तुरकर ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी पथनाट्य करून जनजागृती केली. पथनाट्याच्या माध्यमातून विविध प्रसंगाचे सादरीकरण करत नागरिकांना विचार करायला भाग पाडले. छोट्या- छोट्या प्रसंगातून कित्तुरकर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी मतदानाचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले. आपले मतदान करत असताना कोणत्याही आमिषांना, भूलथापांना बळी पडू नका. आपले मत विकून आपली किंमत कमी करू नका असा संदेश वेगवेगळ्या प्रसंगातून दिला.




या पथनाट्याचे दिग्दर्शन प्रा. शिवाजी पाटील यांनी केले आहे. तर यासाठी प्राचार्य विजयकुमार चौगुले, उपप्राचार्य अनिता चौगुले याचे मार्गदर्शन लाभले. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदार राजा जागा हो मतदानाचा धागा हो, मतदान आपला अधिकार आणि जबाबदारी, वृद्ध असो वा जवान सर्वजण करा मतदान, आपले अमूल्य मत करेल लोकशाही मजबूत आदी घोषणा देण्यात आल्या. 





या घोषणांमुळे विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्राची चव्हाण, लक्ष्मी कुंभार , दिप्ती सुतार,प्रज्ञा रेडेकर, कावेरी धनगर,श्रुती बंदी, स्वप्नाली परीठ,सृष्टी परीठ,अक्षता माने या विद्यार्थिनींनी पथनाट्य सादरीकरणांमध्ये सहभाग घेतला होता. गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णीचा मुख्य बाजारपेठ, कडलगे, नेसरी, महागाव, बटकंणगले या ठिकाणी या पथनाट्यांचे सादरीकरण करण्यात आले. 15  दिवस या पथनाट्याचे सादरीकरण चंदगड मतदारसंघात विविध गावांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी दिली. 




यावेळी नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ, विस्तार अधिकारी बी. के. कासार, सहायक अधिकारी डी. ए. परीट,  एम. एस. कोलुनकर, आर. एन. पाटील यांच्यासह हलकर्णी भाग हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.


 









Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.