गडहिंग्लज (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचाराचा शुभारंभ हलकर्णी (ता.गडहिंग्लज) येथील ग्रामदैवत श्री रामलिंग देवालयातून करण्यात आला.
यावेळी जिल्हा शेतकरी संघाचे संचालक जयकुमार मुन्नोळी यांच्या मार्गर्शनाखाली सर्व पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी अतिशय उत्साहात घर टू घर प्रचारास सुरूवात केली.





