Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो !

हलकर्णी भाग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केली जनजागृती 


मतदार जनजागृतीसाठी काढण्यात आली सायकल रॅली 


गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांनी केले मार्गदर्शन 




हलकर्णी (वार्ताहर): लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी हलकर्णी भाग हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सायकल रॅली काढली. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा राजा हो! अशा घोषणा देत मतदारांना मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. सदर रॅली  प्राचार्य आर एस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल रॅली काढली. यावेळी गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.



रॅलीची सुरुवात हलकर्णी भाग हायस्कूल पासून करण्यात आली. रॅली मुख्य चौकात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदार राजा जागा हो मतदानाचा धागा हो, मतदान आपला अधिकार आणि जबाबदारी, वृद्ध असो वा जवान सर्वजन करा मतदान, आपले अमूल्य मत करेल लोकशाही मजबूत आदी घोषणा देण्यात आल्या. या घोषणांमुळे विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.  




यावेळी विद्यार्थ्यांनी घोषवाक्य लिहिलेले फलक हातात धरले होते. मतदान आपला अधिकार आहे. निष्ठेने मतदान करा. आपल्या परिवारासह शेजारी व सर्व ग्रामस्थांना मतदानासाठी एम. एस. कोलूनकर व आर. एन. पाटील यांनी केले. यावेळी नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ, सहायक अधिकारी डी. ए. परीट, बी. के. कासार, के. बी. पाटील, एस. बी. पाटील, एस.ए. पाटील, स्वाती पोतदार, राजश्री रामाज, प्रा. एस.जी. खानापुरे, प्रा. मुबारक पानारी, प्रा. जे. एस. जाधव, प्रा. पी. व्ही. मुंगुरवाडी,  यांच्यासह हलकर्णी भाग हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.