Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बी.बी.ए., बी.सी.ए. प्रवेश परीक्षेसाठी १८ एप्रिल पर्यंत मुदतवाढ




गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षापासून ए.आय.सी.टी.ई.मान्यताप्राप्त बी.बी.ए., बी.सी.ए अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. या प्रवेश परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी दि. १८ एप्रिल २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सदर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी व पालकांनी आवश्यक माहितीसाठी व प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी महाविद्यालयात प्रवेश परीक्षा माहिती केंद्राशी प्रत्यक्ष संपर्क साधावा असे आवाहन शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम व ॲकॅडेमीक डायरेक्टर डॉ. आर. एस. निळपणकर यांनी केले आहे.



नवीन शैक्षणिक वर्षापासून यु.जी.सी. आणि ए.आय.सी.टी.ई. यांच्या निर्देशानुसार बी.बी.ए., बी.सी.ए. या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी बारावी पास विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाची राज्य सीईटी प्रवेश परीक्षा सक्तीची करण्यात आली आहे. या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष मार्फत प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. या संदर्भात शिवराज महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र व मोफत प्रवेश परीक्षा नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या मुदतवाढीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. बारावी पास व सद्या बारावी परीक्षा दिलेल्या कोणत्याही शाखेच्या इच्छुक विद्यार्थ्यांनी शिवराज महाविद्यालयात प्रवेश परीक्षा माहिती केंद्राशी प्रत्यक्ष संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच या प्रवेश परीक्षा संदर्भात अधिक माहितीसाठी प्रा.के.एस.देसाई ९९७०२२२७६७, बी.बी.ए.विभाग प्रमुख प्रा.आर.डी.कमते-९५५२६३५३८६, प्रा.विक्रम शिंदे ९१५८९१४६४५, मिल्टन नोरेंज ९९२३४१६६१४  यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.