सेवानिवृत्ती निमित्त शिक्षण विभाग प्रमुख भरत काटे यांचा सत्कार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील साधना ज्युनिअर कॉलेज व्यवसाय शिक्षण विभाग प्रमुख भरत सदाशिव काटे यांच्या सेवानिवृत्तीचा कृतज्ञता सोहळा संपन्न झाला. पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर, साधना शिक्षण संस्थेचे सचिव जे. बी. बारदेस्कर यांच्या हस्ते सत्कारमूर्ती भरत काटे यांचा सत्कार संपन्न झाला.
व्यवसाय शिक्षणाचे महत्व विश्द करून ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून ॲटोमोबाईल या शाखेतून असंख्य कृतीशील व उद्यमशील विद्यार्थी घडविण्याचे पुण्यकर्म भरत काटे यांनी केल्याचे प्रतिपादन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य आर. एन. पटेल यांनी केले. या प्रसंगी संस्थेचे सचिव जे. बी. बारदेस्कर, संस्थेचे अध्यक्ष चंदूभाई गुजर, शिक्षक नेते दादा लाड, कोल्हापूर मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष बी.जी. काटे, राज्य मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष के. बी. पोवार, गडहिंग्लज नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. स्वाती शिंदे-कोरी. सुनिल देसाई आदी मान्यवरांनी शैक्षणिक क्षेत्रात भरत काटे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबदल त्यांचे कौतुक केले.
यावेळी साधना शिक्षण संस्थेचे संचालक अरविंद बारदेस्कर, संचालिका फिलॉन बारदेस्कर, प्राचार्य के. एस. पुजारी, जे. वाय बारदेस्कर, जी. एस. शिंदे, श्री. तेलवेकर,श्री. लुद्रिक, श्री.पद्द्मन्नावर, बी. वाय. पाटील, बिपिन माने, डॉ. बेळगुद्री, डॉ. घेवडे, सचिन शिंदे, राहूल पोवार यांच्यासह तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक, सामाजीक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, भरत काटे यांचे नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन प्रा. ए. जी. देशमुख, कु. शिवाजी कुराडे व साधना परिवारातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. सुत्रसंचालन जॉन्सन सोझ, कु. निलोफर शेख यांनी केले. आभार संचालक अरविंद बारदेस्कर यांनी मानले.




