Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला श्री. हाळलक्ष्मी देवीची मंगळवार दि. १४ मे रोजी यात्रा



गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहराचे ग्रामदैवत श्री हाळलक्ष्मी देवीची मंगळवार दिनांक १४ मे  रोजी यात्रा संपन्न होत आहे. अशी माहिती श्री हाळलक्ष्मी देवस्थान ट्रस्ट वडरगे रोड, गडहिंग्लज यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.




सालाबाद प्रमाणे परंपरेनुसार अक्षय तृतीयेच्या पहिल्या मंगळवारी म्हणजेचे १४ मे रोजी साजरी होत आहे. यात्रेचे नियोजन देवस्थान कमिटी व गणेश मंडळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.




सोमवार दिनांक १३ मे रोजी सायंकाळी ५ वाजता यशवंत पाटील खातेदार यांच्या वाडयातून पालखी मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. मंगळवार दिनांक १४ मे  रोजी सकाळी ६ वाजता अभिषेख व पुजा अर्चा होईल, त्यानंतर सेवेकरी कुंभार समाजाच्यावतीने आकर्षक पुजा बांधण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता श्री पनोरे समाजाचा मानाचा नैवेद्य व आरती झाल्यानंतर महाप्रसादास प्रारंभ होईल. दुपारी ४.०० वाजता वडरगे गावच्या श्री गोसावीनाथांच्या पालखीची गळाभेट होवून दोन्ही पालख्या मंदिरात विराजमान होतील.




या यात्रेचे नियोजन करण्यासाठी श्री हाळलक्ष्मी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष किरण कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस उपाध्यक्ष प्रकाश रोटे, सचिव प्रकाश पोवार, खजिनदार यशवंत कोले, सदस्य युवराज बरगे, महेश पाटणे, विजय मोरे, संजय रोटे, प्रविण शिंदे, प्रशांत शिंदे, राजेश रोटे, काशिनाथ बेळगुद्री तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी सदानंद शिंदे, अरुण शिंदे, संदिप रोटे व हाळलक्ष्मी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र खोराटे, सर्व पदाधिकारी व कुंभार समाजाचे यशवंत कुंभार, अनिल कुंभार, सुनिल कुंभार, आप्पा कुंभार व सर्व सेवेकरी उपस्थित होते. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वजण प्रयत्न करीत असून भाविकांनी यात्रा समितीस योग्य ते सहकार्य करावे असे अवाहन यात्रा कमिटीकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.