गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एस.एस.सी.बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. सेमी व मराठी मध्यमाचा १०० टक्के लागला आहे.
मराठी माध्यमातून महागाव केंद्रात प्रथम क्रमांक वरद तेली ( ९५.२०) टक्के), द्वितीय क्रमांक विभागून विपुल चव्हाण व विराज कोकितकर ( ९४.४० टक्के), तृतीय क्रमांक वैभव वागराळीकर (९३.८० टक्के) गुण मिळवत यश संपादन केले. त्याबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे समर्थ महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक चेअरमन शंकरराव पाटील, प्राचार्य आय. एस. पाटील, संस्थाप्रतिनिधी प्रा. डी. एस. पाटील , आण्णासाहेब पाटील, पर्यवेक्षक मोहन कांबळे यांनी अभिनंदन केले.

