Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल हलकर्णी परिसरात जल्लोष



गडहिंग्लज (प्रतिनिधी): नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल हलकर्णीत परिसरातील कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. हलकर्णी येथील मुख्य चौकात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.  साखर,पेढे व जिलेबी वाटप करण्यात आले. मोदी यांच्या हॅट्रिक डिजिटल फलकाला दुग्धाभिषेक घालण्यात आला.




यावेळी भाजपा सरचिटणीस अविनाश दुध्यागोळ, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष अमरदीप व्हसकोटी, प्रसाद जोशी, गणपती पाटील, युवराज लोखंडे ,आदित्यसिंह राठोड, लकाप्पा बसर्गे, आप्पासाहेब पवार,  गिरीश तुपुरवाडी सुधीर जारकोळी,अनुज जोलापुरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.