Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नगरपरिषद व नगरपंचायतीमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 11 ऑगस्टला मतदान

 

            



मुंबई : विविध नगरपंचायती व एका नगरपरिषदेतील एकूण 11 सदस्य पदांच्या रिक्त जागांसाठी आणि हातकणंगले (जि. कोल्हापूर) नगरपंचायतीच्या थेट अध्यक्षपदाच्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी 11 ऑगस्ट 2024 रोजी मतदान होणार आहेअसे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

            


खालापूरपाली (जि. रायगड)निफाडसुरगाणा (जि. नाशिक)बोदवड (जि. जळगाव)धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु. (जि. नंदुरबार)कवठेमहांकाळखानापूर (जि. सांगली)चंदगड (जि. कोल्हापूर) आणि बाभूळगाव (जि. यवतमाळ) या नगरपंचायतींच्या सदस्यपदांच्या प्रत्येकी एका रिक्त जागेसाठी मतदान होईल. त्याचबरोबर कन्हान-पिपरी (जि. नागपूर) नगरपरिषदेच्या सदस्यपदाच्या एका रिक्त जागेसाठी देखील मतदान होणार आहे.

            


नामनिर्देशनपत्रे 18 ते 24 जुलै 2024 या कालावधीत स्वीकारली जातील. रविवारी सुटीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. 25 जुलै 2024 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. 11 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 12 ऑगस्ट 2024 रोजी मतमोजणी होईलअसेही राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.