गडहिंग्लज (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाचा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा तालुकास्तरीय आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 'दैनिक तरुण भारत'चे पत्रकार प्रकाश चौगुले (महागाव) यांना प्रदान करण्यात आला.
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे सीईओ कार्तिकेयन एस यांच्या उपस्थितीत नुकताच झालेल्या सोहळ्यात हा पुरस्कार देऊन पत्रकार प्रकाश चौगुले यांना सन्मानित करण्यात आले. पत्रकार श्री चौगुले यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील केलेल्या उत्कृष्ट लिखाणांची दखल घेत हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.
पुरस्कार मिळाल्याबद्दल समर्थ महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक चेअरमन शंकरराव पाटील, प्राचार्य आय. एस. पाटील, संस्था प्रतिनिधी प्रा. डी एस पाटील, अण्णासाहेब पाटील, पर्यवेक्षक मोहन कांबळे यांच्यासह महागाव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह अन्य परिसरातील व्यक्तीनी त्यांचे अभिनंदन केले.

