Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजच्या संत अंतोनी चर्चच्या प्रमुखपदी फादर कुस्तास लिमा यांची नियुक्ती



गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज येथील संत अंतोनी चर्चच्या प्रमुखपदी फादर कुस्तास लिमा यांची नियुक्ती करण्यात आली. ख्रिस्ती समाजाने त्यांचे मोठ्या आनंदाने स्वागत केले.



गडहिंग्लज तालुक्यात १७ खेड्यामध्ये वास्तव्यास असलेल्या ५०० ख्रिस्ती कुटुंबासाठी संत अंतोनी चर्च हे प्रमुख चर्च आहे. या चर्चच्या अखत्यारीत नेसरी, हेब्बाळ जलद्याळ, माद्याळ, पिंपळगांव येथे लहान लहान प्रार्थना केंद्र आहेत. अंदाजे ३००० ख्रिस्ती बंधु भगीनी असलेल्या या गडहिंग्लज प्रमुख धर्म ग्रामात ख्रिस्ती लोकांसाठी वर्षभरातील सण, नाताळ, गुड फ्रायडे, इस्टर संडे, सर्व संतांचे सण या धार्मिक विधीसह दररोज चर्चमध्ये प्रार्थना याशिवाय साखरपुडा, विवाह विधी, अंत्य संस्कार, आजारी लोकांसाठी प्रार्थना, सर्व धर्मिय स्नेह मेळावा, सर्व धर्मियांच्या सुख दुःखात सहभागी होणे असे अनेक धार्मिक व सामाजिक उपक्रम साजरे केले जातात.



सन २०१८ ते २०२४ अशी ६ वर्षे रेव्ह. फादर जो मंतेरो यांनी या चर्चचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळला. आणि चर्चच्या आवारात समाजासाठी अनेक सुखसोई उपलब्ध करुन दिल्या. त्यांची बदली खानापूर (जिल्हा बेळगाव) येथे झाल्याने त्यांच्या रिक्त जागी खानापूर येथील फादर कुस्तास लिमा यांची बदली गडहिंग्लज धर्म ग्राम येथे संत अंतोनी चर्च येथे झाली असून पुर्वीच्या धर्मगुरु कडून औपचारिकरीत्या त्यांनी कार्यभार स्विकारला असून गडहिंग्लज धर्म ग्रामातील समस्त ख्रिस्ती समाजाने त्यांचे आनंदाने स्वागत केले आणि पुर्वीच्या धर्मगुरुंच यथोचित सत्कार करुन त्यांचेही आभार मानले.




या प्रसंगी ख्रिस्ती समाज कमिटी, महिला मंडळ, युथ ग्रुप सह १७ खेडयातील हजारो लोक, तसेच सर्व धर्मिय प्रतिनिधी व धार्मिक प्रतिनिधी उपस्थित होते. नव नियुक्त धर्मगुरु यांनी गडहिंग्लज येथील चर्च व परिसरातील खेडापाडयात सर्व धार्मिक आणि सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबवून सर्व धर्म समभाव जपण्याचा कसोसीने प्रयत्न करीन आणि आपणही मला पुर्वीप्रमाणेच सहकार्य करावे असे आवाहन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.