Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भडगाव हिरण्यकेशी पुलावर दोन्ही बाजूला गवत वाढले, पाण्याचाही निचरा होईना

पुलावरील रस्त्याची स्वच्छता करण्याची गरज 


ठाकरे शिवसेना पक्षाचे उपतालुकाप्रमुख वसंत नाईक यांनी वेधले लक्ष 






गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव येथे हिरण्यकेशी नदीवर असणाऱ्या फुलावरील रस्त्याच्या स्वच्छतेअभावी पाणी तुंबून राहत आहे. दोन्ही बाजूला गवत वाढल्याने रात्रीच्या अंधारात वाहन चालकांना वाहतूक करणे धोक्याची बनत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने पुलावरील रस्त्याची स्वच्छता करावी अशी मागणी ठाकरे शिवसेना पक्षाचे उपतालुकाप्रमुख वसंत नाईक यांनी केली आहे.




भडगाव  येथील  हिरण्यकेशी पुलावर सकाळी व संध्याकाळी बरेच लोक फ़िरायला येत असतात. मात्र पुलाच्या दोन्ही  बाजूला  गवत उगवले असुन रस्त्याच्या बाजुला पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी असलेले व्होल देखील पुर्ण  बंद झाले आहेत, त्यामुळे  पाणी  पुलावर  तुबूंन रहात आहे. त्यामुळे चालत जाणाऱ्या व्यक्तींना मोठी अडचण निर्माण होत आहे. परिणामी यामुळे रस्ता देखील निसरडा होत असल्याने दुचकीस्वारांना देखील हा रस्ता धोक्याचा बनला आहे.  पुलाच्या  दोन्ही बाजूला संरक्षण लोखंडी रोलिंग पाइप बसविण्यात आले असून त्यावर रेडीयम रिफ्लेक्टर लावला आहे. मात्र गवताच्या वाढीमुळे  ते झाकून गेले आहे. त्यामुळे वाहन चालकांना रात्री  काही अंदाज  येत  नाही. संबंधित विभागाने तात्काळ प्रत्यक्ष भेट  देऊन  पाहणी करण्याची गरज आहे. पुलावरील उगवलेले गवत काढून परिसर स्वच्छ करण्याची गरज आहे. या समस्येकडे तालुकाप्रमुख वसंत नाईक यांनी लक्ष वेधले आहे.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.