आमदार राजेश पाटील यांच्याकडून एकूण ३५ लाखांचा निधी प्राप्त
मोहरम निमित्त छोटे पीर आणि बडे पीरचे घेतले दर्शन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्यातील हलकर्णी येथे चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा पार पडला.
आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून हलकर्णी येथे मुस्लिम समाजाच्या पीर मासाबी दर्गा सुशोभीकरणासाठी पाच लाख, इदगाह मैदान परिसर सुशोभिकरणासाठी दहा लाख, उर्दू शाळेसमोर सुशोभिकरण करण्यासाठी दहा लाख रुपये, धनगर समाजातील बिरदेव मंदिरासमोर सांस्कृतिक हॉलसाठी दहा लाख रुपयांचा निधी अशा एकूण 35 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या विकासकाकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आमदार राजेश पाटील यांनी हलकर्णीतील मुस्लिम समाजाच्या छोटे पीर आणि बडे पीर या दर्ग्याचे दर्शन घेतले. मोहरम सणाच्या निमित्ताने विकासकामांना निधी देत मुस्लिम बांधवाना आमदार राजेश पाटील यांनी भेट दिली. दरम्यान, आमदार पाटील यांनी धनगर समाजातील बांधवांशी व उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांशी सवांद साधला.
यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष जयसिंगराव चव्हाण, जिल्हा शेतकरी संघाचे संचालक जयकुमार मनोळी, महाबळेश्वर चौगुले, बाजार समिती माजी अध्यक्ष अभय देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील, मुन्नासो नाईकवाडी, नूर मकानदार, उमरअली बागवान, लायकअली मालदार बाबासाहेब तबलजी, अलिसाहेब कादर भाई, बाबुराव चौगुले, नौकुडचे सरपंच शुक्राचार्य चोथे, जिल्हा मजूर संघाचे संचालक दीपक पुजारी, शाम धनगर, रणजित पाटील, हसीन तहसिलदार, प्रसाद जोशी, युवा उद्योजक शिवकुमार संसुधी यांच्यासह मुस्लिम बांधव, धनगर बांधव, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.










