गडहिंग्लज (प्रतिनिधी): आषाढी एकादशी निमित्त नौकुड ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत रोपांचे वाटप करण्यात आले. यामध्ये पिंपळ, काजू, बेल, लिंबू या झाड रोपांचा समावेश होता. सदर रोपांचे वाटप सरपंच शुक्राचार्य चोथे यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी चाळोबा मंदिर, अंगणवाडी, ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच शुक्राचार्य चोथे, देवस्थान समिती अध्यक्ष सुनिल शेलार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शुक्राचार्य चव्हाण, शंकर गुरव, भाऊ पाटील, केरबा गोईलकर, यशवंत गोईलकर, बबन दरेकर, शिवाजी गुरव, केशव कदम, रामू खैरे, नेताजी पाटील, श्रीधर जाधव, महेश लोहार तसेच सौ. अरुणा मांगले, अश्विनी पाटील, सारिका बिरंजे यांच्यासह ग्रामस्थ, शेतकरी, युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
व्हिडिओ येथे पहा 👇👇


