सरपंच मानधनातून गावात नागरिकांना बसण्यासाठी बाकडी
नागरिकांतून विधायक उपक्रमाचे होतेय कौतुक
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : नेसरी येथील लोकनियुक्त सरपंच गिरिजादेवी शिंदे-नेसरीकर यांनी वर्षभर जमा झालेल्या सरपंच मानधनातून १२ लोखंडी बाकडी व ग्रामीण रुग्णालय आवारात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
सरपंच शिंदे-नेसरीकर यांनी गावातील विविध गरजेच्या ठिकाणी बाकडी बसवून त्या ठिकाणच्या नागरिकांची व रस्त्याने ये जा करणाऱ्या पादचाऱ्यांची बसण्यासाठीची व्यवस्था केल्याने या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे. गेल्या वर्षीही सरपंच मानधनातून नेसरी विभागातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळांतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले होते. सरपंच शिंदे-नेसरीकर यांचा दरवर्षी विविध विधायक उपक्रम राबविण्याचा मानस आहे. दरम्यान, नेसरी ग्रामीण रूग्णालय परिसरात मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपणही करण्यात आले. शामकुमार नाईक यांनी स्वागत केले. ग्रामपंचायत सदस्या रुक्सार नुलकर यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ नागरिक प्रल्हाद माने यांच्या हस्ते बाकड्याचे पूजन करून बाकडी लोकार्पण करण्यात आली.
यावेळी नेसरी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक चंद्रकांत खोत, डॉ. सुरेश कदम, डॉ. सत्यजित देसाई, ग्रामपंचायत सदस्य अशोक पांडव, रामचंद्र परीट, किरण हिडदुगी, मुस्तफा मुजावर, वंदना नांदवडेकर, ज्योती देसाई, स्नेहल नावलगी, शांता सुतार, अश्विनी सुभेदार, ज्योती पेडणेकर, पार्वती खराबे, तंटामुक्त अध्यक्ष मजीद वाटंगी, चंद्रकांत शिंदे, शिवाजी देसाई, रामचंद्र भोसले, विष्णू कोलेकर, ओमकार कुंभार, विजय कांबळे, राजू कुंभार, अमर पाटील, अजित सुतार यांच्यासह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



