शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ. रियाजभाई शमनजी यांचा विश्वास
कोवाड येथे भगवा सप्ताह निमित्त सभासद नोंदणी
जनतेतून भगवा सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद
गडहिंग्लज (प्रतिनिधी ): कोल्हापूर जिल्हा ग्रामीण मधील शिवसैनिकांच्या अडचणी, समस्या समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न मी करत आहे. या माध्यमातून पक्ष संघटना बळकट करण्यावर माझा भर राहील. चंदगड विधानसभा मतदार संघावर ठाकरे शिवसेनेचाच हक्क असून या मतदारसंघावर भगवा नक्की फडकेल यात तीळमात्र शंका नाही असा विश्वास व्यक्त करून सर्व शिवसैनिकांनी पक्षाचे "मशाल" चिन्ह घरोघरी पोहोचवावे असे आवाहन सहसंपर्कप्रमुख डॉ. रियाजभाई शमनजी यांनी केले.
चंदगड तालुक्यात जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भगवा सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. कोवाड येथे सभासद नोंदणी कार्यक्रमाप्रसंगी सहसंपर्कप्रमुख डॉ. शमनजी ते बोलत होते. यावेळी चंदगड विधानसभा संपर्कप्रमुख अशोक निकम, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सह संपर्कप्रमुख डॉ. शमनजी म्हणाले, गेली चाळीस वर्षे मी मुंबईपासून शिवसैनिक म्हणून प्रामाणिक व निष्ठेने काम करत आहे. इतक्या वर्षातील पोचपावती म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्हा ग्रामीण विभाग सह संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी माझ्याकडे देऊन माझ्यावर विश्वास दाखविला आहे ही बाब माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला अभिमानास्पद आहे. पक्षप्रमुखांनी दाखवलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी प्रसंगी रक्ताचे पाणी करेन. ग्रामीण भागातील पक्ष संघटना वाढीसाठी सर्व शिवसैनिकांना एकसंघपणे घेऊन कोल्हापूर ग्रामीण मधील शिवसेना पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी माझा प्रयत्न राहील. चंदगड विधानसभा मतदारसंघातील जागा ही शिवसेनेच्या हक्काची आहे. या मतदारसंघात ठाकरे शिवसेना पक्षाचाच आमदार होईल. त्यामुळे सर्वांनी मिळून या मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवू व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करूया असे आवाहन त्यांनी केले.
शिवसेना चंदगड तालुकाप्रमुख लक्ष्मण मनवाडकर म्हणाले, चंदगड विधानसभेची जागा ही शिवसेना कायम लढत आली असून या ठिकाणी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम करणारी जनता मोठ्या प्रमाणात असून ३५ हजार गठ्ठा मतदानाचा फायदा शिवसेनेच्या उमेदवाराला होतो. त्यामुळे ही विधानसभेची जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे अशी मागणी करत चंदगड विधानसभा मतदारसंघात ठाकरे पक्ष शिवसेनेचाच आमदार होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संपर्कप्रमुख अशोक निकम म्हणाले, शिवसैनिकांनी चंदगड विधानसभेबद्दल मागणी केली आहे. ती योग्य असून पक्षप्रमुखांच्या समोर चंदगड विधानसभेची परिस्थिती सांगून ही जागा आपण आपल्याकडे घेण्यासंदर्भात मागणी करू अशी ग्वाही त्यांनी दिली. येत्या महिन्याभरात पक्षाचे मशाल हे चिन्ह शिवसैनिकांनी घरोघरी पोहोचवावे असे आवाहन त्यांनी केले.
सुरुवातीला छत्रपती श्री शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन* करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विभाग प्रमुख संदीप पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल रियाजभाई शमनजी यांचा सत्कार करण्यात आला.
उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर म्हणाले, चंदगड विधानसभा मतदार संघाची जागा कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे राहावी अशी मागणी सर्व शिवसैनिकांची आहे. त्यामुळे या मतदारसंघातील जागा ही शिवसेनेला नक्की मिळेल व या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तालुकाप्रमुख अनिलभाऊ दळवी, उपतालुकाप्रमुख विनोद पाटील, रवींद्र पाटील, महिला आघाडी उपतालुकाप्रमुख सौ. गुलाबी शिंदे, विभाग प्रमुख सौ अर्चना कांबळे, शाखाप्रमुख सौ नंदा पाटील, सौ शारदा होसुरकर, युवासेना तालुकाप्रमुख गणेश बागडी, माजी तालुकाप्रमुख अशोक मनवाडकर, शाखाप्रमुख मारुती कांबळे, मारुती पाटील, परसराम मुरकुटे, सुभाष वडरेकर, उपशाखाप्रमुख दशरथ दिंडे , शाखाप्रमुख भरमा पाटील,शाखाप्रमुख नारायण माने, गटप्रमुख रवींद्र पाटील, इरेशी नाईक, परशराम मंडलिक, तुकाराम चिरमुरकर, राजाराम पाटील, अनिरुद्ध कुटरे, राकेश पाटील, शंकर पाटील, प्रमोद पाटील, उपशाखाप्रमुख बाबू पाटील, लक्ष्मण भिंगुर्डे, अर्जुन पाटील, परशराम डांगे, संजय पाटील, काशिनाथ माने, एकनाथ पाटील, नारायण पाटील, रामदास देसाई, रामू नाईक, लगमा तेरणी, मल्लापा गोरामट्टी, यल्लाप्पा मुचंडी,आप्पाजी पाटील, चाळू पाटील, निंगाप्पा नंदनवाडकर, परशराम पाटील, शंकर पाटील यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते. दरम्यान, गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी, हेळेवाडी, हेब्बाळ, कवळीकट्टी येथे देखील भगवा सप्ताह साजरा करण्यात आला.






