Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज येथे भाजी विक्रेत्या महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

खणगावे गल्ली येथे घडलेल्या घटनेने हळहळ व्यक्त 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज येथील नीता शिवाजी मुधोळे (वय 50, खणगावे गल्ली) या भाजी विक्रेत्या महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. किराणा दुकानातील लाईटचे बटण सुरू करताना शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.



खणगावे गल्ली येथे शिवाजी मुधोळे हे आई, पत्नी, मुलगा व मुलगी या कुटुंबासह राहतात. त्यांचे या ठिकाणी किराणा दुकान आहे. शनिवारी दुपारी नीता यांचे पती व सासू हे दोघे शेताकडे तर मुले कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे दुकानात नीता होत्या. यावेळी त्यांनी दुकानातील लाईटचे बटण सुरू करत असताना त्यांना अचानक विजेचा जोराचा धक्का बसला. यामुळे त्या जमिनीवर कोसळल्या. दुकानाला साहित्य आणण्यासाठी आलेल्या एका महिलेला नीता या जमिनीवर कोसळल्याचे दिसले. तातडीने येथील नागरिकांनी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे त्यांना दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. नीता या किराणा दुकान चालविण्याबरोबरच भाजीपाला खरेदी-विक्री करत होत्या. त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.