महसूल पंधरवडा निमित्त आयोजन ,९५ दाखल्याचे वाटप
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महसूल विभागामार्फत १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत महसूल पंधरवडा साजरा होत आहे. या निमित्ताने महागावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलमध्ये 'विस्तार समाधान योजना २०२४' अंतर्गत महाराजस्व अभियान उत्साहात संपन्न झाले. यावेळी महसूल विभागामार्फत विविध दाखले व सेवांचा लाभाचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच प्रशांत शिंदे होते.
मंडल अधिकारी रजनी चंदनशिवे यांनी सर्वांचे स्वागत करत शासनाच्या योजनांची माहिती दिली. यावेळी तलाठी स्वाती मोरे यांनी ई-पीक पहाणी मोबाईलवरून कसे भरायचे? याविषयी प्रात्यक्षिक करून दाखवले. महागाव मंडळ अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना महसूल विभाग, ग्रामपंचायतमार्फत घर उतारे, सातबारा, आठ-अ, डायरी उतारे, तलाठी उत्पन्नाचे दाखले, पीएम किसान योजना यासारख्या एकूण ९५ दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी वैरागवाडी सरपंच पी.के. पाटील, उंबरवाडी सरपंच कविता सुतार, हरळी खुर्द सरपंच साधना आयवाळे, हसुरवाडी सरपंच कोमल भोसमोडे, हिडदुगी सरपंच संतोष कांबळे, उपसरपंच संदीप कोकितकर, ग्रामविकास अधिकारी शशिकांत कुंभार, ग्रामपंचायत सदस्य परशराम हुले, फिरोज सोलापुरे, अर्जुन रेडेकर, राजू वाली, संजय गडकरी, रवींद्र कांबळे, तलाठी धनश्री पोवार, जयश्री चव्हाण, सुजाता कुडाळकर, आपले सरकार सेवा केंद्राचे संतोष झोकांडे, अनिल घेवडे, हर्षवर्धन कोकितकर यांच्यासह महागाव मंडलांतर्गत सर्व पोलीस पाटील, कोतवाल,ग्रामपंचायत कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश चौगुले यांनी केले.




