साखर वाटप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार राजेश पाटील यांचे मानले आभार
ग्रामदैवत श्री रवळनाथ देवाला गोड नैवेद्यही दाखविला
गडहिंग्लज (प्रतिनिधी): नौकुड (ता.गडहिंग्लज) येथे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने'चे महिलांच्या खात्यावर पहिला व दुसरा हप्ता असे तीन हजार रूपये जमा झाल्याबद्दल गावातील सर्व महिलांनी गावचे ग्रामदैवत श्री रवळनाथ देवाला गोड नैवेद्य दाखवला व एकमेकींना साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला.
या योजनेतील नोंदणी करिता आवश्यक कागदपत्रांची अटी सीमाभागातील बहिणींना अडचणीच्या ठरल्या होत्या, त्यावर विभागाचे आमदार राजेश पाटील यांनी शासनाकडे जाचक अटी शिथील करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे सीमाभागातील हजारो बहिणींना लाभ मिळाला आहे, यामुळे लाडक्या बहिणींनी आमदार पाटील यांचे विशेष आभार मानले.
तसेच सौ. सुस्मिताताई राजेश पाटील यांनी नौकुड गावच्या 500 भावांना रक्षाबंधन निमित राखी पाठविली होती. बहिणीच्या प्रेमाखातर आमदार राजेश पाटील यांना पुन्हा विधानसभेत पाठवू असे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शुक्राचार्य चव्हाण यांनी गावच्या वतीने आपल्या मनोगतात केले.
यावेळी सरपंच शुक्राचार्य चोथे, तुकाराम बिरंजे, यशवंत पाटील, सौ. शितल मांगले, सौ.सविता गोईलकर यांनी मनोगते व्यक्त केली.
याप्रसंगी ग्रा.पं.सदस्या सौ. सुवर्णा गोसावी, सौ.शितल मांगले, सौ.कविता मांगले, सौ.सविता गोईलकर, सौ.सुरेखा गोईलकर, सौ. राजश्री मांगले, सौ.रोहिणी मांगले, सौ.शांता नाईक, सौ.रेखा बिरंजे, सौ. मंगल मांगले, सौ.रेश्मा परीट, सौ.रेखा बिरंजे, सौ.शांता नाईक, सौ.प्रभावती गोईलकर, सौ.लता गोईलकर, सौ.रेश्मा परीट, सौ. आक्कताई पाटील, सौ. लक्ष्मी दरेकर, सौ.सुजाता कोरे तसेच गावातील सर्व बचत गटातील महिला, अंगणवाडी सेविका, मदतनीस, सर्व संस्थांच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्हिडिओ येथे पहा 👇👇





