326 मल्लांचा सहभाग
विजेत्या खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड
गडहिंग्लज (प्रतिनिधी): क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत, जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर व गडहिंग्लज तालुका क्रीडा शिक्षक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय शासकीय कुस्ती स्पर्धा नगरपरिषद गांधीनगर पॅव्हेलियन हॉल व गणेश मंगल कार्यालय, गडहिंग्लज येथे अतिशय उत्साही वातावरणात पार पडल्या. 14, 17 व 19 वर्षाखालील विविध वजनी गटात 326 खेळाडूंनी फ्रीस्टाइल व ग्रीको रोमन स्पर्धेत सहभाग घेतला. विजेत्या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. विजेते खेळाडू कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
स्पर्धेचे उदघाटन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या हस्ते झाले. जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. नीलिमा अडसूळ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी राजू खणगावे, रमेश रिंगणे, नरेंद्र भद्रापूर, आशियाई सुवर्णपदक विजेता पैलवान रवींद्र पाटील, महेश कोरी, नितीन देसाई, राजन जाधव, महेश घुगरी, जितेंद्र पाटील, दीपक पाटील, आप्पासाहेब पाटील, मिलिंद कोरी, विश्वास खोत, युवराज बरगे, रफिक पटेल, संदीप कागवाडे, संजय बटकडली, भडगावचे पोलीस पाटील उदय पुजारी, कृष्णराव जाधव, प्राध्यापक एस. बी. चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपत सावंत यांनी केले.महाराष्ट्र राज्याचे कुस्ती मार्गदर्शक प्रवीण कोंडावळे यांनी आभार मानले. स्पर्धेचे परीक्षण महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ, कोल्हापूर जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष पैलवान रवींद्र पाटील, शहराध्यक्ष संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वसंत पाटील, कृष्णांत चौगुले, संदीप पाटील, बाबा शिरगावकर, दीपक देवरकर, तानाजी बंडगर, महेश पाटील, वैभव तेली, श्रीकांत पाटील, महेश पाटील, वैभव यादव, अरुण पाटील, स्वागत पाटील, तानाजी कुराडे, अक्षय नलवडे यांनी पंच म्हणून काम केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विनायक नाईक, संपत सावंत, पैलवान शंकर कुरळे, प्रा. देवदत्त पाटील, राजाराम माने, मदन दास, प्राध्यापक जयवंत पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.





