गडहिंग्लज (प्रतिनिधी): महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या मिशन हायस्कूल बारामती येथे १७ वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत जागृती हायस्कूलच्या नैतिक दशरथ तेलवेकर व शुभम मारुती साळवेकर या खेळाडूनी उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी केल्यामुळे त्यांची दिनांक २६ ते २९ सप्टेंबर दरम्यान नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.
या यशस्वी खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष डॉ सतीश घाळी, उपाध्यक्ष अरविंद कित्तुरकर, सचिव ॲड. बी.जी. भोसकी, सहसचिव गजेंद्र बंदी, संचालक ॲड. विकासअण्णा पाटील, संघापान्ना दड्डी, डॉ. शिवकुमार कोल्हापुरे, इंजि. किशोर हंजी, महेश घाळी व कंगुरीअण्णा यांची प्रेरणा तर मुख्याध्यापक विजयकुमार चौगुले, उपमुख्याध्यापक उमेश सावंत, पर्यवेक्षक शिवाजी अनावरे यांचे प्रोत्साहन मिळाले. जिमखाना विभाग प्रमुख संपत सावंत, सचिन मगदूम, प्रकाश हारकारे, दयानंद ग्वाडी, सुभाष तिप्पे यांचे मार्गदर्शन मिळाले.

