चिंचेवाडी येथे 'संत गजानन पॉलीटेक्निक'मध्ये नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत
गडहिंग्लज (प्रतिनिधी): सध्याच्या तंत्रज्ञानात रोज नवनवे बदल होत आहे. जगभरातील माहिती इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला एका क्लिकवर मिळत आहे. या बदलत्या काळाबरोबरच टिकून राहायचे असेल तर अभ्यासाबरोबरच नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन स्वतःला सिद्ध करून दाखवावे लागेल. आपली चिकित्सावृत्ती जागृत ठेवून अध्ययन करावे. असा सल्ला संत गजानन महाराज पॉलिटेक्निक मधील नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत प्रसंगी प्राचार्या रोहिणी पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला.
प्रास्तावना प्रा. सुरज चौगुले यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कॉलेजमधील वेगवेगळ्या विभागात विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रा. विक्रम मोहिते, प्रा. मंजुनाथ पाटील, प्रा. प्रदीप लोंढे, प्रा. निलजीत माळी, प्रा. सचिन मोर्ती प्रा, स्वप्निल मनगुळे,प्रा. गुरुनाथ बिरणगड्डी ,प्रा. संतोष गुरव यांनी विद्यार्थ्यांना कॉलेज व संस्थेबद्दल माहिती दिली. प्रा. मोहन तराळ यांनी आभार मानले.



