Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हरवलेले पाकीट परत करत 'साधना'च्या विद्यार्थ्याने दाखवला प्रामाणिकपणा!

कु. श्लोक पाटील याने सापडलेले पाकीट केले परत 


पाकिटात चार हजाराची रक्कम,  महत्वाची होती कागदपत्रे





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज येथील साधना हायस्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिकणाऱ्या कु. श्लोक प्रकाश पाटील या विद्यार्थ्याने सापडलेले पैशाचे पाकीट प्रामाणिकपणे संबंधित व्यक्तीला परत करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले. याबद्दल सत्कार करत श्लोकच्या प्रामाणिकपणाला शाबासकी देण्यात आली.




शुक्रवारी महागाव येथील युनूस हावळे यांचे संकेश्र्वर रोडवरील पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर पैशाचे पाकीट अनावधानाने खिशातून पडले. सदरचे पाकीट साधना हायस्कूलचा इयत्ता सातवीतील विद्यार्थी श्लोक पाटील याला शाळेतून घरी पायी जाताना सापडले. त्या पाकिटात श्री. हावळे यांचे चार हजार इतकी रोख रक्कम शिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड असे महत्वाची कागदपत्रे होती. त्याने घरी जाऊन पाकिटातून सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांचा मोबाईल नंबर शोधून काढत त्यांना फोन करून त्यांचे पाकीट सापडल्याची माहिती दिली. त्यानुसार श्री. हावळे यांनी श्लोक याने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या घरी जाऊन आपले पाकीट ताब्यात घेतले. पाकिटातून पैसे आणि इतर कागदपत्रे व्यवस्थित असल्याची खात्री केली.



शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक करण्याच्या हेतूने त्यांनी साधना हायस्कूलच्या मुख्याध्यापक व शिक्षकांना ही माहिती दिली व त्याचा सत्कार करण्याची विनंती केली व शाळेने सदर विनंतीस होकार दिला. त्यानुसार श्री. हावळे यांनी शाळेत जाऊन श्लोक याचा पुष्गुच्छ व शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देत सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांसमोर सत्कार केला. त्याच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी साधना हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य आय.पी. कुटीनो, पर्यवेक्षक ए. जे. बारदेस्कर, जमीर हावळे, संग्राम संकपाळ, श्रावण घोलाकाये, वैभव देसाई यांच्यासह शाळेतील शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.