२५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास
कैद झाला आहे.
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी येथील श्री लक्ष्मी मंदिरातील पंचवीस हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरीस गेले आहेत. सदर मुद्देमाल चोरणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या चोरीची फिर्याद मंदिराचे पुजारी सौ. मायव्वा पाटील यांनी हलकर्णी पोलीस दूरक्षेत्र येथे दिल्याने या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, पुजारी सौ पाटील यांनी दिनांक 4 सप्टेंबर रोजी रात्री लक्ष्मी मंदिराच्या हॉलच्या समोरील दरवाजा बंद करून कुलूप लावून गेल्या होत्या. दरम्यान, रात्री अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कडी कोंयडा तोडून मंदिरात प्रवेश केला. गाभाऱ्याच्या दरवाजास असलेले कुलूप उचकटून दरवाजा उघडला व आतील देवीचा चांदीचा मुखवटा, गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र, चांदीचा कमरपट्टा असे एकूण पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने हा चोरटा कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

