Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला उद्या ठाकरे शिवसेनेचे 'महिला शिव सर्वेक्षण अभियान'

महिला पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लजला ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने दिनांक १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता कडगाव रोडवरील शिवसेना जिल्हा ग्रामीण मध्यवर्ती कार्यालयात महिला शिव सर्वेक्षण अभियानाचे आयोजन केले आहे. अशी माहिती जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी पत्रकातून दिली आहे.



यावेळी शिवसेना उपनेत्या डॉ. ज्योती ठाकरे, छायाताई शिंदे, मीरा-भाईंदरचे संपर्क संघटक रोशनीताई कोरे- गायकवाड, माजी नगरसेविका संजनाताई मुणगेकर उपस्थित राहणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून करण्यात येणारी पूर्वतयारी, रणनीती, मतदारांची प्रत्यक्ष गाठभेट, मतदार संघटन, महिला पदाधिकाऱ्यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा आदी विषयांवर या अभियानाद्वारे चर्चा केली जाणार आहे. शिवसेनेच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख प्रा. शिंत्रे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.