मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी साधला संवाद
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गणेशोत्सवानिमित्त हलकर्णी येथील शिवशंकर हत्तरकी व सामाजिक कार्यकर्ते, समाजरत्न डॉ. गंगाधर व्हसकोटी यांनी पंचायत समिती मतदारसंघातील सर्व गणेश मंडळांना भेट देत मंडळाच्या कार्यकर्त्यांना व गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या.
घरगुती गौरी गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर आता सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. या निमित्ताने सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी भजन, आरती, हळदी कुंकू, विविध स्पर्धा, महाप्रसाद आदी कार्यक्रम राबवित आहेत. या पार्श्वभूमीवर या मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी शिवशंकर हत्तरकी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. गंगाधर व्हसकोटी, माजी सरपंच श्री. इंगळे, हलकर्णीचे उपसरपंच सलीम यमकमर्डी यांच्यासह मान्यवरांनी पंचायत समिती मतदार संघात प्रत्येक गणेश मंडळाला भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी सर्व गणेश मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी शिवशंकर हतरकी व सामाजिक कार्यकर्ते डॉ. गंगाधर व्हसकोटी यांचा सत्कार केला. या भेटीमुळे गणेश मंडळांचा उत्साह वाढला. यावेळी त्यांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान, या मान्यवरांनी कडलगे येथील अडीसिद्धेश्वर स्वामीजी यांचे आशीर्वाद घेतले.













