Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दुंडगेच्या नूतन सरपंच सौ. रेखा लाटकर यांचा श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ व ट्रस्टच्या वतीने सत्कार



गडहिंग्लज (प्रतिनिधी): दुंडगे (ता. गडहिंग्लज) च्या सरपंचपदी सौ. रेखा अरुण लाटकर यांची निवड झाल्याबद्दल श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ व श्री स्वामी समर्थ ट्रस्ट यांच्यामार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. 



स्वागत मंडळाचे सचिव सचिन ओहरा यांनी केले. त्यानंतर अध्यक्ष आप्पासाहेब खवरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व साडी भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पुढील वाटचालीसाठी मंडळाकडून शुभेच्छा देण्यात आल्या. आभार शिक्षक दिनकर खवरे यांनी मानले.



कार्यक्रमास पुष्पक शहा, राघवेंद्र नाईक, अजित मगदूम, कपिल पाटील, अरुण घबाडे, संदीप सोलापूरे, अक्षय हिरेमठ, दयानंद नाईक, बसप्पा नाईक व मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.