मुंबई : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन पाचच्या ट्रॉफीचा मानकरी सुरज चव्हाण ठरला. अगदी शांतपणे खेळणारा सुरज सर्वांच्याच पसंतीला पडला. त्याच बोलणं, वागणं याबद्दल बिग बॉसच्या घरातच नव्हे तर घरा बाहेर देखील चर्चा झाली. सुरज चव्हाणच विजय होणार चर्चा सोशल मीडियावर देखील झाली.
बिग बॉस चा आतापर्यंतचा विचार केला तर निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, जानव्ही किल्लेकर, सुरज चव्हाण हे बिग बॉस मराठीचे फायनलिस्ट होते. जान्हवी किल्लेकर हिने नऊ लाख रुपये घेऊन तर त्यानंतर अंकिता वालावलकर घराबाहेर पडल्या. टॉपच्या चार स्पर्धकांमधून धनंजयला माघार घ्यावी लागली. त्यामुळे या स्पर्धेत सुरज चव्हाण, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी हे टॉप तीन मध्ये गेले. यामध्ये बाजी मारत सुरज चव्हाणने टॉप दोन मध्ये स्थान मिळवले. आणि अखेर प्रेक्षकांनी पसंती देत सुरज चव्हाणला बिग बॉस मराठीचा विजेता ठरविला.
कोण आहे हा सूरज?
सूरज चव्हाणचा जन्म 1992 मध्ये बारामती तालुक्यातील मोडवे गावात झाला. त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरीब होती. सूरज लहान असतानाच त्याच्या वडिलांचं कर्करोगामुळं तर आजारपणामुळं आईचे निधन. झाले आहे. गरीबीमुळे सूरजला आठवीपर्यंतच शिक्षण घेता आले. सूरजला पाच बहिणी आहेत. मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला आहे.
'बुक्कीत टेंगूळ', 'गुलिगत धोका'डायलॉगमुळं प्रसिद्ध
सूरजला त्याच्या बहिणीच्या मुलाकडून टिकटॉक ची माहिती मिळाली. त्याने दुसऱ्याच्या मोबाईलवरून पहिला व्हिडिओ केला होता. त्याचा हा पहिलाच व्हिडिओ चांगला व्हायरल झाला होता. त्यानंतर मजुरी करून मिळालेल्या पैशातून त्याने मोबाईल घेतला होता. त्याच्या खास स्टाइलमुळं तो सोशल मीडियावर लोकप्रिय झाला. त्यानंतर इंस्टाग्राम, यूट्यूबवर व्हिडिओ बनवायला सुरूवात केली. 'बुक्कीत टेंगूळ', 'गुलिगत धोका' या डायलॉगमुळं सूरज लोकप्रिय झाला.

