नंदनवाड येथे विविध विकास कामांचे लोकार्पण व उदघाटन उत्साहात
निखिल राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती
गडहिंग्लज (प्रतिनिधी): नंदनवाड (ता गडहिंग्लज) या गावासाठी चंदगड विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पाटील यांनी विशेष लक्ष देत 4 कोटी 4 लाख रुपयांचा भरघोस विकासनिधी दिला आहे. यातून जाधव वसाहत व मगदूम वसाहती कडे जाणारे रस्ते 70 वर्षानंतर पहिल्यांदा डांबरीकरण झाले. अशा कार्यामुळेच जनसामान्यांनी त्यांना "कार्यसम्राट" ही पदवी बहाल केली आहे असे गौरवोदगार कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघाचे संचालक जयकुमार मुन्नोळी यांनी काढले.
नंदनवाड येथील विविध विकास कामांचे लोकार्पण व उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना श्री. मुन्नोळी पुढे म्हणाले, आज आमदार राजेश पाटील अन्यत्र व्यस्त असल्याने त्यांचे प्रतिनिधी म्हणून चिरंजीव निखिल पाटील यांच्या हस्ते कार्यक्रम घेताना नंदनवाडकर हे खऱ्या अर्थाने आमदार पाटील यांचे कुटुंबीय झाले आहेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रमुख उपस्थित निखिल राजेश पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण व उदघाटन करण्यात आले. यावेळी निखिल पाटील यांनी आमदार राजेश पाटील यांना पुन्हा निवडून द्या. पुढच्या टर्मला दुप्पट विकास निधी देण्यासाठी मी पाठपुरावा करेन अशी ग्वाही दिली.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील यांनी युती सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. प्रामुख्याने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेतून महिलांना प्रतिमहा पंधराशे प्रमाणे साडेसात हजार रुपये खात्यावर जमा झाले आहेत. यातून महिलांना खूप मोठी आर्थिक ताकद मिळाल्याचे सांगताना ज्यांना अजून लाभ मिळालेला नाही अशा सर्व महिलांना जिल्हा बँकेकडून विशेष सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी जिल्हा मजूर संघाचे संचालक व नंदनवाड गावचे सुपुत्र दीपक पुजारी यांनी आमदार राजेश पाटील यांनी गावचा पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी दोन बंधारे (केटीवेअर), हायमास्ट पथदिवे, वाहतुकीसाठीचा नवा पूल, सावेकर गल्लीतील काँक्रीट रस्ता, गटारी अशा विविध विकासकामांचा लेखाजोखा मांडला. या कामांचे पोच पावती नंदनवाडकर मतपेटीतून भरघोस मताधिक्याने नक्की देतील अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्रीमंत पुजारी, रमेश मगदूम, शरद बाडकर, तेजस सावेकर, सुरेश बाडकर, कृष्णा मगदूम, विठ्ठल पाटील, भीमा हादगले, शेट्टपा पाटील, भीमा पाटील, तात्यासाहेब देसाई, चंद्रकांत हसुरकर, मारुती दड्डीकर, रमेश सावेकर, अण्णाप्पा पाटील, आप्पासो रेडेकर, हलकर्णीचे नारायण पाटील, रामलिंग दुध्यागोळ, शिवकुमार संसुद्धी, प्रसाद जोशी, नागाप्पा पाटील, सचिन देसाई, नारायण हसुरकर, संभाजी सावेकर,महादेव पवार, बसवराज सुतार, केम्पना पाटील, रामचंद्र पाटील, शिवाजी तुपुरवाडी, मारुती खोत, सुभाष मगदूम, संदेश गोसावी, सुरेश केसरकर, कृष्णा भोसले, तानाजी कागीनकर, बसवराज पुजारी, रामचंद्र अकोळे, शिवाजी पाटील, छायाप्पा कांबळे, सचिन बिरंजे, अमोल सावेकर, शिवाप्पा बोगरणाळ, स्वप्नील अकोळे, गंगाराम सावेकर, संतोष जाधव, सुरेश जाधव, सातवा जाधव, राजू तेरणी, मोहन गोसावी, शिवानंद मासगोंडा, सुनील मगदूम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन आनंदा वाघराळकर यांनी केले.






