Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सुन्नी जुम्मा मस्जिदच सभासदत्व आमच्या हक्काचं ते आम्हाला मिळालच पाहिजे!

गडहिंग्लजला मस्जिद समोर मुस्लिम बांधवांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण   

सभासद करून न घेतल्यास यापुढे आमरण उपोषणाचा इशारा 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज येथील सुन्नी जुम्मा मशिदीचे सभासद करून न घेतल्याबद्दल सुन्नी मुस्लिम बांधवांनी मस्जिद समोर आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून लक्ष वेधले. याबाबतचे निवेदन सुन्नी जुम्माचे प्रेसिडेंट, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ संभाजीनगर यांना देण्यात आले आहे. सुन्नी जुम्मा मस्जिद गडहिंग्लजच सभासदत्व आमच्या हक्काचं ते आम्हाला मिळालच पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली.



निवेदनात म्हटले आहे की, गेल्या एक वर्षापासून वेळोवेळी लेखी अर्ज व तोंडी विनंती करून देखील सुन्नी जुम्मा मस्जिदचे सभासद करून घेण्यास टाळाटाळ केले जात आहे. रीतसर सभासदाचे अर्ज व चलनाने सभासद फी भरून देखील सभासद करून घेतलेले नाही. गेल्या अनेक पिढ्यांपासून गडहिंग्लज शहरात सुन्नी मुस्लिम म्हणून राहण्यास आहोत. रीतसर वार्षिक वर्गणी देत आहोत. तरी देखील सभासद करून घेतले जात नाही.



देणगी स्वरूपात वार्षिक वर्गणी (सालांना चंदा) घालतो पण सभासदत्व मिळत नाही, बाहेर गावातून न आलेले सभासद होऊन संचालक झाले, पण पिढ्यानपिढ्या गडहिंग्लन शह‌रात राहून नियमित सालाना चंदा देवून सुध्दा सभासद होवू शकलो नाही, मरहूम हाजी अब्दुलगनि मकानदार व हाजी बाळासाहेब ठगरी यांनी सन २० डिसेंबर २०१२ रोजी जे अर्ज केले. या अर्जाचे आज अखेर उत्तर मिळाले नाही, दि. ३१ मे २०२३ व दि. २ सप्टेंबर २०२४ रोजी आम्ही अर्ज करून माहिती मागितलेल्या अर्जाची आज अखेर पोच किंवा त्याचे उत्तर मिळालेले नाही, गडहिंग्लज शह‌रामध्ये मुस्लिम सुन्नी समाजाची २५० ते ३०० घरे असताना समाजाचे फक्त ६० सभासदच का? त्या ६० सभासदांची यादी सही व शिक्क्यांनीशी मिळावी, सन २००७ ते २०२२ पर्यंतचे शासकीय ऑडीट झालेच पाहिजे, सर्व सुन्नी मुस्लिम बांधवाना सुन्नी जुम्मा मशीदचे सभासद करून घेतलेच पाहिजे, सुन्नी जुम्मा मशीद गडहिंग्लजची चौकशी वक्फ ॲक्टचे कलम ५२ (अ), ७० प्रमाणे झालीच पाहिजे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. 



यावेळी मन्सूर मुल्ला, नजीर पटेल, जमीर मुल्ला, इस्माईल मकानदार, आझाद मुल्ला, शौकत नदाफ, ताहीर मकानदार, सिकंदर नणदीकर,  निहालअहमद अत्तार, आरिफ पटेल, शकील काझी, अयुब मुल्ला, जावेद मकानदार, अझरुद्दीन बोजगर, युनूस नणदीकर यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.