Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला भारतीय जनता पार्टीची विजयी संकल्प मोटरसायकल रॅली व सभा



गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सुचनेनुसार 'बुथ ते राज्य स्तरावर भाजप' यावर आधारित विजयी संकल्प रॅली व सभेचे आयोजन केले होते.


ऐतिहासिक दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ  रॅलीला प्रारंभ झाला व डॉक्टर्स काॅलनीमध्ये सभेच्या ठिकाणी विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनाने याची सांगता झाली.


आगामी विधानसभा निवडणुकीत कागल मतदार संघातून महायुतीचे उमेदवार वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार केला.


यावेळी भाजपचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तारळे, भाजपा अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष इंजिनीयर चंद्रकांत सावंत, तालुका अध्यक्ष प्रितम कापसे, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा प्रा. अनिता चौगुले यानी मनोगते व्यक्त केली.


कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पाटील, पंचायत समिती माजी सभापती प्रकाश पाटील, औरनाळचे सरपंच संदिप पाटील, अनिल खोत, शहर महिला मोर्चा अध्यक्षा निलांबरी भुईंबर, शहर महिला सरचिटणीस भारती सावंत, तालुका महिला अध्यक्षा परमेश्वरी पाटील, अर्चना रिंगणे, विश्वनाथ खोत, वामन बिलावर, पृथ्वी तारळे, यश इंगळे, वरुण गोसावी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.