Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

योग्य पर्याय निवडा; आम्ही तुमच्या पाठीशी !

नेसरी येथे 'नेसरीकर समविचारी आघाडी'च्या बैठकीत कार्यकर्त्यांचा निर्धार 


सरपंच गिरिजादेवी शिंदे-नेसरीकर यांना निर्णयाचा सर्वाधिकार





गडहिंग्लज (प्रतिनिधी): सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोराने वाहू लागले असून सगळीकडेच बैठकांना जोर आला आहे. नेसरी येथील सरपंच सौ. गिरिजादेवी शिंदे-नेसरीकर यांच्या नेतृत्वाखालील नेसरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळेस उदयास आलेली नेसरीकर समविचारी आघाडीतील प्रमुख कार्यकर्त्यांची मते आजमावून घेण्यासाठीची बैठक पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी योग्य पर्याय निवडा; आम्ही सर्वच कार्यकर्ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे जाहीर करत दोन दिवसात आपल्या आघाडीचा पाठिंबा कोणाला हे जाहीर करण्याचे सर्वाधिकार सरपंच गिरिजादेवी शिंदे यांना असल्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थानिक देवस्थान सल्लागार उपसमितीचे अध्यक्ष संग्रामसिंह शिंदे-नेसरीकर होते.

       



सुरुवातीला स्वागत एम. एस. तेली यांनी करून बैठकीचा उद्देश विषद केला. यानंतर बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक विषयांवर जोरदार चर्चा झाली. आपली समविचारी आघाडी गावच्या विकासाच्या दृष्टीने बनवली असल्याने ती अपक्षच आहे. त्यामुळे गावच्या विकासासाठी दोन वर्षात निधीसाठी अडचणी निर्माण झाल्या. शिवाय आपण कोणत्या पक्षात नसल्याने निधी देण्यासही टाळाटाळ झाली. लोकसभेवेळी महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारात सक्रिय राहून नेसरी व नेसरी परिसरात मताधिक्य देण्यामागे नेसरीकर समविचारी आघाडीचा मोलाचा वाटा होता. मात्र त्याकडेही महाविकासच्या नेते मंडळींनी डोळे झाक केली. त्यामुळे आता योग्य पर्याय निवडण्याची वेळ आली असून जो पर्याय सरपंच सौ. गिरीजादेवी शिंदे-नेसरीकर निवडतील तो सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल आणि तो निर्णय लवकर घेण्याचे सर्वाधिकार सौ. गिरिजादेवी शिंदे-नेसरीकर व संग्रामसिंह शिंदे-नेसरीकर यांना असल्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.




यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष मजीद वाटंगी, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र परीट, किरण हिडदुगी, मुस्तफा मुजावर, कमल नाईक, स्नेहल नावलगी, वंदना नांदवडेकर, सुप्रिया सुतार, शांता सुतार, उस्मान कदिम, भिकाजी दळवी, रामा भोसले, प्रकाश दळवी, व्ही. के. नाईक, ऍड. विलास नाईक, मार्तंड कोळी, वसंत गवेकर, अस्लम बागवान, बबन पाटील, दयानंद गंगली, आप्पा नाईक, प्रताप देसाई, संजय नाईक, सतीश जोशी, उदय नाईक, संभाजी नाईक, मायाप्पा नाईक, श्रावण कांबळे, अतुल कांबळे, राहुल कांबळे, संतोष नाईक, संजय पाटील, चंद्रकांत नावलगी, साईनाथ पाटील, शिवा मटकर, विश्वनाथ रेळेकर, पंकज घाटगे, रवींद्र बोरगल्ली, प्रसाद हल्याळी, संदीप डवरी, रोहन गुरव, कबीर नाईक यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार विनायक पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.