दिनांक 6 ते 8 मे या कालावधीत पार पडणार यात्रा
देवस्थान कमिटीच्या बैठकीत निर्णय ; ग्रामस्थ लागले तयारीला
गडहिंग्लज (प्रतिनिधी): नौकुड (ता.गडहिंग्लज) येथील श्री.महालक्ष्मी देवीची यात्रा दिनांक ६ मे ते दिनांक ८ मे २०२५ या कालावधीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थ यात्रेच्या तयारीला लागले आहेत.
यात्रा ठरवण्यासंदर्भात नौकुड गावचे सरपंच शुक्राचार्य चोथे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये देवस्थान कमिटी, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, हक्कदार उपस्थित होते. यावेळी यात्रेसंदर्भात चर्चा करून श्री. महालक्ष्मी देवीची यात्रा ही मे २०२५ मध्ये करण्याचे ठरविण्यात आले. सदर श्री महालक्ष्मी देवीची यात्रा ही १० वर्षानंतर होत आहे. या पूर्वीची महालक्ष्मी देवीची यात्रा ही मे २०१५ मध्ये झाली होती.
यावेळी देवस्थान कमिटी अध्यक्ष सुनिल शेलार, उपाध्यक्ष शुक्राचार्य चव्हाण, कार्याध्यक्ष श्रीकांत गुरव, सेक्रेटरी संजय डवरी, तंटामुक्त समिती अध्यक्ष भाऊसाहेब लोहार, उपसरपंच भिमराव गोडसे, अरविंद घेवडे, अशोक गुरव, सुधाकर गुरव, चाळू गुरव, संभाजी चौगुले, शिवाजी मांगले महादेव गुरव, राकेश चव्हाण, जीवना बिरंजे, जयवंत बिरंजे यांच्यासह देवस्थान कमिटीतील सर्व पदाधिकारी हक्कदार, ग्रामस्थ उपस्थित होते.

