Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजमध्ये उसाने भरलेली ट्रॉली उलटली ; सात दुचाकी वाहनांचे नुकसान

ट्रॅक्टर चालकाला पकडत नागरिकांनी केले पोलिसांच्या स्वाधीन 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहरात कडगाव रोडवर उसाने भरलेली ट्रॉली उलटल्याने सात दुचाकी वाहनांचे नुकसान झाले असून एक जण जखमी झाल्याचे वृत्त हाती आले आहे. दरम्यान, संतप्त नागरिकांनी ट्रॅक्टर चालकाला पकडत पोलिसांच्या स्वाधीन केले. 




याबाबत अधिक माहिती अशी की, हिटणीहुन संताजी घोरपडे साखर कारखान्याकडे ऊस घेऊन ट्रॅक्टर झाला होता. यावेळी गडहिंग्लज शहरातील कडगाव रोडवरील चढतीवर उसाने भरलेल्या ट्रॉलीचा रॉड निघाल्याने ट्रॉली उलटली. यामध्ये आजूबाजूला थांबविण्यात आलेल्या सात दुचाकींचे नुकसान झाले असून एक जण जखम झाल्याचे सांगण्यात आले. ही घटना घडल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रॅक्टर चालकाला पकडत पोलिसांच्या स्वाधीन केले. सध्या उसाचा हंगाम सुरू असल्याने शहरातून मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर मधून ऊस वाहतूक होत आहे. त्यामुळे नागरिकांसह या वाहनांच्या आजूबाजूला असणाऱ्या वाहनांना याचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.