Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बेळगाव येथील मराठी बांधवांच्या महामेळाव्याला जाणाऱ्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी कोगनोळी टोल नाक्यावर रोखले



कोल्हापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव येथे आयोजित केलेल्या महामेळाव्याला जाणाऱ्या ठाकरे शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना व हजारो  शिवसैनिकांना कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक पोलिसांनी रोखल्याने संताप व्यक्त करण्यात आला. बेळगावला जाण्यापासून रोखल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यानी या पोलीस प्रशासनाचा निषेध केला.



यावेळी जिल्हाप्रमुख व उपनेते संजय पवार, कोल्हापूर जिल्हा सह संपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे,  वाहतूक सेना जिल्हाप्रमुख हर्षल पाटील, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे यांच्यासह हजारो शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.