गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहरातील काळभैरी रोडवर वळण घेताना अंदाज न आल्याने चंदगड आगाराची एसटी बस कोल्ड्रिंक्समध्ये घुसल्याची घटना आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये कोणाला दुखापत झाली नाही. या घटनेनंतर नागरिकांनी नाराजी व्यक्त करत शहरातील धोकादायक वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला.
याबाबतची अधिक माहिती अशी की, आज दुपारी चंदगड -कोल्हापूर ही बस काळभैर रोडवर आल्यानंतर वळण घेताना अचानक अंदाज न आल्याने समोरील कोल्ड्रिंक्स हाऊसमध्ये घुसली. त्यामुळे या एसटीची समोरील काच फुटली. मात्र सुदैवाने त्या कोल्ड्रिंक हाऊसमधील कोणाला दुखापत झाली नाही. मात्र या घटनेने अवजड वाहनांना धोकादायक ठरणारे हे वळण मात्र चर्चेत आले.

